Breaking News

*बँड व्यावसायिकांचा टाहो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून काम करण्याची मुभा देण्यासाठी मागणी*

*बँड व्यावसायिकांचा टाहो, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून काम करण्याची मुभा देण्यासाठी मागणी*

वर्धा प्रतिनिधि-पंकज रोकड़े
वर्धापाच महिन्यात शासनाने कवडीची मदत केली नाही, कोरोनाच्या पार्शवभूमीवर बँड व्यवसायिकांनी पूर्ण नियम पाळले, सर्वत्र अनलॉक बॅण्डव्यवसायीकांमुळेच कोरोना संसर्ग भीती कशी? आता परिवाराला जगवायचे कस?शासनाने
नियम अटी शर्थी लादल्याने जगन अशक्य

दिनांक 24 /08/2020रोजी बँड संचालक मंगेश प्रधान यांच्या नेतृत्वात सर्व बँड पथक संचालकानी युवा स्वाभिमान पार्टी चे विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय गाठले असता उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक दौऱ्या असल्याने कार्यालयात नायब तहसीलदार हूड यांचमार्फत जिल्हाधिकारी साहेब वर्धा यांना निवेदन पाठवण्यात आले बँड संचालक यांची बाजू दिलीप पोटफोडे यांनी ठेवताना अधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिल कि बँड कलाकार वर्षातील सहा महिने सिझन करतो आणि त्यावर च पुढल्या सहा महिन्याच्या जीवनमान, उदर निर्वाह च नियोजन लावतो, परंतु कोरोना संसर्गच्या पार्शवभूमी वर मागील पाच महिन्यात आधीच हलाखिची परिस्थिती असलेला बँड कलाकार या चार महिन्यात पूर्णतः मोडला आहे, होत नव्हतं सर्व संपलं, कोणी उधार वाडी द्यायला तय्यार नाही असं असताना महाराष्ट्र राज्यात सर्वत्र अनलॉक सिस्टिम सुरु झाली आणि जीवनमान पूर्ववत होणं सुरु असताना मात्र परिस्थिती न तुटलेल्या बँड व्यवसायिका वर मात्र शासनाची टांगती तलवार काही पिच्छा सोडायला तय्यार नाही शासनाला जर बँड व्यवसायिक काम करण्यासाठी मनाई करायची असेल तर बँड व्यवसायिक बँड कलाकार यांच्या परिवाराच्या किमान उदर निर्वाह होईल असं अगोदर नियोजन लावा नंतर नियम अटी लावा,संपूर्ण महाराष्ट्र टाळेबंदी मुक्ती कळे वाटचाल करत आहे अश्या स्थितीत बँड व्यावसायिक व परिवाराला जगता यावं या साठी काम करण्याची मागणी यावेळी माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदन द्वारे करण्यात आली दिलीप पोटफोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बँड सर्व बँड संचालक यांनी मंगेश प्रधान यांच्या नेतृत्वात निवेदन सादर केले यावेळी , श्रीकृष्ण प्रधान, उकंडराव खंडारे, विश्वासराव तायवाडे, हेमंत चावरे, श्री मनोज प्रधान, मारोती लांडगे, हरिदास जी वानखेडे अनिल चरणदास सनेसर, वानखेडे अनिल कांबळे, सचिन प्रधान इ उपस्थिती होते

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …