*बेलोना मधील घटना विजेचा करंट लागून गरोदर म्हशीचा मृत्यू*

बेलोना प्रतिनिधी :चंद्रशेखर मस्के
बेलोना- रात्री झालेल्या वादळी पाऊस आणि वाऱ्याने अरुण श्रीरामे व नारायण भास्कर यांच्या घराजवळील मेन पोलवरील लाईन तार तुटून पडल्यामुळे ललिता रामेश्र्वर नासरे यांची म्हैस विजेच्या धक्याने मरण पावली ती म्हैस 9 महिन्याची गाभण असून ललिता नासरेवर मोठे संकट कोसळले आहेत .ती सकाळी नऊ च्या दरम्यान आपले जनावरे गोठ्यातून चरण्यासाठी नेत असता विजेच्या तुटलेल्या तारानी म्हशीला जोरदार धक्का लागला असता तिचा जागीच मृत्यू झाला .
तिथल्या काही लोकांनी हा प्रकार पाहताच पोलीस स्टेशनला तसेच विद्युत मंडळाला माहिती दिली असता पोलिस आणि विद्युत मंडळ अधिकारी उपस्थिती झाले .
परिसरातील काही जनतेची ग्रामपंचायत वरती आणि विद्युत मंडळावर सुधा नाराजी व्यक्त केली आहे .आज म्हैस मेली आमचे लहान मुले इथे खेळतात आमचे जाणे येणे इथूनच आहे जर आमचे लहान मूल किंवा आमच्यातील कोणी येथे मेले असता याला जिमेदार कोण राहिलं असा प्रश्न परिसरातील जनता करीत आहे .तसेच विद्युत मंडळ अधिकारी आणि पोलीस तपास करत आहे
Maharashtra News Media सच की आवाज