Breaking News

*नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना झाली कोरोनाची लागण* *स्वत: तुकाराम मुंढेंनी ट्विटर वर ट्विट करुन याबाबतची माहिती दिली* *“नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी पुढील काही दिवस मी घरातून काम करेन ; आपण नक्की जिंकू-आयुक्त तुकाराम*

*नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना झाली कोरोनाची लागण*

*स्वत: तुकाराम मुंढेंनी ट्विटर वर ट्विट करुन याबाबतची माहिती दिली*

*“नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी पुढील काही दिवस मी घरातून काम करेन ; आपण नक्की जिंकू-आयुक्त तुकाराम*

मुख्य संपादक किशोर ढूंढेले

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणतीही लक्षण नाही, अशी माहिती मुंढेंना दिली. आपण नक्की जिंकू, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

“माझा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोणतीही लक्षण नाही. मी स्वत:ला अलगीकरणात ठेवलं आहे. दरम्यान गेल्या 14 दिवसांपासून माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी,” असे ट्विट त्यांनी केले आहे.

तसेच “नागपुरातील कोरोना नियंत्रणात येण्यासाठी पुढील काही दिवस मी घरातून काम करेन. आपण नक्की जिंकू,” असे त्यांनी यावेळी सांगितले.

दरम्यान नागपुरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी तुकाराम मुंढे यांनी अनेक मास्टरप्लॅन केले आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे. नागपुरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

नागपूरमधील खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर हे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं हे विषेश पथक गठन करण्यात आलं. त्यामुळे खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप लागणार असल्याचं दिसत आहे. मनपाचं हे विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.

मुंढे यांच्याकडे काम करणारा एका अटेंडन्टची करोना चाचणी रविवारी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळं संपूर्ण स्टाफची तपासणी करण्यात आली. त्यात मुंढे यांच्या ताफ्यातील एक पोलीस आणि स्वत: मुंढे यांना करोनाची लागण झाल्याचं निदान झालं आहे.

तुकाराम मुंढे गेल्या पाच महिन्यांपासून नागपूरमध्ये करोनाचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सातत्यानं अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या बैठका घेत आहेत. लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी म्हणून ते स्वत: रस्त्यावरही उतरलेले दिसले होते. लॉकडाऊनच्या कठोर निर्णयांवरून महापालिकेतील सत्ताधारी भाजपशी त्यांचे अनेकदा खटकेही उडाले. मात्र, मुंढे यांनी कठोर निर्णयाचा धडाका सुरूच ठेवला होता. नागपूरच्या जनतेचाही त्यांना पाठिंबा मिळाला होता.

 

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …