*मुल नगर परिषद अंतर्गत करण्यात येणार्या स्वच्छता अभियानाची चौकशी करा अन्यथा आंदोलन*

*मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांची मागणी*
वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख
वरोरा– मुल येथे तालुका शिवसेनेतर्फे मुल शहरात स्वच्छता अभियानातील कचरा संकलन व नेली सफाई ची चौकशी करावी अशी तक्रार मुल तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांच्याकडे केली सविस्तर वृत्त असे
मुल शहर आज महाराष्ट्रात स्वच्छता अभियानाच्या प्रथम स्थानावर आहे परंतु प्रथम क्रमांकाला काही अर्थच उरला नाही आज महाराष्ट्र सरकारने करोडो रुपये अनुदान दिले परंतु नाल्यावर नाल्या व रोड वर रोड,बगीचा व सौंदर्यकरण करण्यात आजपर्यंत धन्यता मानली आहे.
मुल शहरात दर महिन्याला लाखो रुपये खर्च करून ठेकेदाराला नाली सफाई व कचरा संकलन चा ठेका दिलेला आहे गेल्या चार ते पाच महिन्यापासून नाली सफाई झालीच नाही तरी पण नगर परिषद संपूर्ण देयक अदा करण्यात आहे तसेस लॉक डाऊन मध्ये तब्बल दोन महिने नाली सफाई तसेस फवारणी केलेला नाही याची चौकशी झालीच पाहिजे नाहीतर करोना सदृश्य परीस्थितीत मलेरिया अशा अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल.
मुल शहरात या अभियानात काम करणारे अनेक सफाई कर्मचारी या ठेकेदाराकडून त्रस्त आहेत स्वच्छता देयकाच्या चौकशी झालीच पाहिजे अन्यथा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात येईल तसेस यापुढे नाली सफाई तथा कचरा संकलन करताना GEO TAG कॅमेरा ने फोटो दिल्याशिवाय मासिक देयक देऊ नये अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी केली शिष्टमंडळात तालुका संघटक महेश चौधरी , माजी ता. प्रमुख सुनिल काळे, उपतालुका प्रमुख संदिप निकुरे , उपतालुका प्रमुख रवि शेरकी, प्रभारी शहर प्रमुख राहुल महाजनवार, सचिन वाढई,अंकुर कड्यालवार , विजय भोयर अन्य शिवसैनिक हजर होते.
Maharashtra News Media सच की आवाज