*पतांजली योगा-प्रणायाम ऑनलाईन प्रशिक्षण संपन्न*

*महीला पतंजली योग-प्राणायाम समिती कडून आयोजन*
उपजिला प्रतिनिधी-दुर्गाप्रसाद पांडे
कोंढाळी– दि.२८- ऑगस्ट महाराष्ट्र राज्य महिला पतंजली योग समिती द्वारा दिनांक 15 जुलै ते 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन योग व प्राणायाम प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये महाराष्ट्रातील 250 प्रशिक्षणार्थींनी भाग घेतला व आपले योग प्रशिक्षण पूर्ण केले या अंतर्गत योग ,प्राणायाम सकाळी साडेपाच ते साडेसात या वेळात संपन्न होत होते व साडेतीन वाजता पासून पुन्हा पाच वाजता पर्यंत थेअरी क्लास चालत होता ज्यामध्ये शरीर विज्ञान ,योग ,ध्यान, प्राणायाम , अष्टांग योग , प्राणतत्त्व, गीता दर्शन यामागील सिद्धांत, तत्व आयुर्वेद , जडीबुटी ,आहार शास्त्र, नॅचरोपॅथी या सर्व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले याचा पुढील भाग म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांना प्रॅक्टिकल करून दाखवावे लागले.
एक सकाळचे सत्र घेऊन दाखवावे लागले. नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी येथिल सोनम पांडे, प्रांजली पोकळे,सिंधू ताई ढोबाळे, मंगला भांगे, मोहिनी जाधव यांनी 27व 28 ऑगस्टला वर्ग घेतले यात लक्ष्मी नारायण शर्मा, गणेश चरडे, उत्तमराव गिरडकर, सुधाताई कडू, छाया ताई घाडगे, प्रतिभा पोकळे, यांचे सहकार्यातून ऑनलाईन योग सत्र घेतले या प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र राज्य पतंजली महिला समिती द्वारा केले गेले होते.

महाराष्ट्र प्रभारी शोभा भांगिया ,मध्य पूर्व महाराष्ट्र प्रमुख कोंढाळी पतंजली योग समितीतील सर्व सदस्यांनी विशेष पुढाकार घेऊन या प्रशिक्षणामध्ये अधिकाधिक लोकांचा सहभाग वाढविला व २८ प्रशिक्षणार्थ्यांनी याअंतर्गत प्रशिक्षण घेतले . प्रशिक्षणाअंती ऑनलाइन लेखी व प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यात आली. सदर प्रशिक्षणार्थी योग प्रशिक्षक म्हणून नियुक्तीस पात्र झालेत.
Maharashtra News Media सच की आवाज