*विद्यार्थ्यांना अमानुष रित्या मारहाण प्रकरणाचा भाजपा युवा मोर्चा चामोर्शी तर्फे निषेध*

गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोंली/ चामोर्शी- धुळे येथील आभाविप च्या विद्यार्थ्यांना मा.पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे समोर पोलिसांनी अमानुष मारहाण करण्यात आली*
धुळे येथील आभाविप च्या विद्यार्थ्यांना मा. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे समोर पोलिसांनी अमानुष मारहाण करण्यात आली त्या घटनेचा जाहिर निषेध भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका चामोर्शी च्या वतीने नोंदवून मा. तहसीलदार चामोर्शी यांना निवेदन दिले.
धुळे येथे काल मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे कोरोना संकटात परीक्षा न घेता जमा असलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावे तसेच ह्यावर्षी शिक्षण शुल्क कमी करावे अशा रास्त मागण्या घेऊन गेलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) च्या विद्यार्थ्यांना मंत्र्यांच्या अंगरक्षकांनी त्यांच्यासमोरच अमानुष मारहाण केली होती, माणूसकीला काळीमा फासणाऱ्या ह्या घटनेचा भाजपा युवा मोर्चा चामोर्शी तालुका तर्फे *गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी* यांच्या मार्गदर्शाखाली आज तहसीलदार संजय गंगथळे यांना एक निवेदन देऊन ह्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला तसेच ह्या घटनेतील दोषींवर लवकरात लवकर कडक कारवाई करण्याची मागणी ह्या निवेदनातुन करण्यात आली तसेच ह्यावेळी भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर तहसीलदार यांचेशी चर्चा केली.
निवेदन देतांना मा. दिलीपजी चलाख ता. अध्यक्ष मा. साईनाथजी बुरांडे ता. महामंत्री , मा. प्रतिक राठी भाजयुमो ता. अध्यक्ष , मा. शुभम लांजेवार भाजयुमो ता. उपाध्यक्ष इत्यादी.
Maharashtra News Media सच की आवाज