Breaking News

*पेंच धरणाचे पूर्ण गेट करण्यात आले खुले* *नदीकाठावरील असलेल्या गावांना केला सावधान राहण्याचा इशारा*

*पेंच धरणाचे पूर्ण गेट करण्यात आले खुले*

*नदीकाठावरील असलेल्या गावांना केला सावधान राहण्याचा इशारा*

विशेष प्रतिनिधी :- पंकज चौधरी

पारशिवनी- तालुक्यातील पेंच धरण हे पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण बनलेले आहे..या ठिकाणी खूप दुरून-दुरून पर्यटक येत असतात.हे पेंच धरण अतिशय मोठ्या प्रमाणात दूरवर पसरलेलं क्षेत्र आहे.दर पावसाळ्यात काहीतरी प्रमाणात पाणी साचून धरणाची पातळी वाढत असते.अश्या वेळी या धरणाला एकूण 16 गेट असून आपत्कालीन परिस्तितीत हे गेट उघडून पाणी बाहेर सोडल्या जाते.आजदेखील दिवस भर सतत पाऊस पडल्याने पाण्याची पातळी वाढली.म्हणून आज पेंच धरणाचे एकूण पूर्ण 16 गेट 2.5 मिटर अश्या प्रमाणात उघडण्यात आले आहेत..त्यामुळे ती नदी पूर्णपणे भरून जात आहे.अश्या वेळी नदीकाठच्या गावातील लोकांना सावधानीचा इशारा देण्यात आला आहे.सालई,उमरी पाली,काळाफाटा अश्या गावांचा त्यात समावेश आहे..

Check Also

*सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला*

🔊 Listen to this *सुनील केदार यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दीला* मुख्य संपादक – …