Breaking News

*लॉयन्स क्लब नागपूरतर्फे कला-वाणिज्य महाविद्यालय पाटणसावंगी येथिल विद्यार्थीनिला आर्थिक मदत*

*लॉयन्स क्लब नागपूरतर्फे कला-वाणिज्य महाविद्यालय पाटणसावंगी येथिल विद्यार्थीनिला आर्थिक मदत*

 

पाटणसावंगी विशेष प्रतिनिधि

पाटणसावंगीयेथील कला-वाणिज्य महाविद्यालयात लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटी तर्फे कु धनश्री कामडी बी. ए. भाग २ च्या विद्यार्थीनिला शैक्षणिक मदत म्हणून ५००० रू. चा धनादेश व काही उपयोगी वस्तू देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नागपूर कृषी विकास प्रतिष्ठान, नागपूर चे सदस्य मा. श्री. सुधिरभाऊ केदार,तर लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटी चे अध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर कारकर, सचिव डॉ. अंजनीकुमार मिश्रा , कॅबिनेट ऑफिसर मा. श्री. राजेश जोशी, कोषाध्यक्ष मा. श्री दिपक तांबेंकर, तसेच आदर्श विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मा सौ. काळमेघ मॅडम, तसेच कला-वाणिज्य महांविद्यालयाचे
कार्यकारी प्राचार्य श्री. भूषण निकूरे उपस्थित होते. हा कार्यक्रम घडवून आणण्यात महाविद्यालय आणि
लॉयन्स क्लब ऑफ नागपूर सिटी यांच्यामधील दुआ प्रा. डॉ.बी वाय नांदेकर कौशल्य विकास विभाग प्रमुख ‘तथा
माजी अध्यक्ष लॉयन्स: क्लब ऑफ नागपूर सिटी प्रामुख्याने उपस्थित होते. मनोगंत व्यक्त करतांना धनश्री
म्हणाली माझी कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बिकट आहे. आई वडील मजुरी करतात लायन्स क्लब ने मदत केली
नसती तर माझे पुढिल शिक्षण झाले नसते. मी जिद्दीने अभ्यास करूर शिक्षण घेत राहील. लॉयन्स क्लब
सदैव माझ्या स्मरणात राहील.” या कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजय सोरते, आभार प्रदर्शन श्री.भूषण
निकूरे यांनी केले.
प्रस्तुत कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग पाळून करण्यात आला.

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …