Breaking News

*सुप्रीम कोर्टाच्या अवमानणा प्रकरणी नरेन्द्र मोदी व योगी आदीत्यनाथ यांना समाज क्रांती आघाडी ची कायदेशीर नोटीस*

*सुप्रीम कोर्टाच्या अवमानणा प्रकरणी नरेन्द्र मोदी व योगी आदीत्यनाथ यांना समाज क्रांती आघाडी ची कायदेशीर नोटीस*

 

कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे

कोरपना :- येथील समाज क्रांती आघाडी च्या वतीने पंतप्रधान आणी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यानाच नोटीस बजावून हायकोर्टात अवमान याचीका दाखल करण्याचा इशाराही या वेळी दिला आहे. गडचांदूर येथील लोखंडे निवासी एका मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्यांनी मिटिंगमध्ये समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक मुकुंद खैरे यांच्या माफँत हायकोर्टाच्या वकील अँड. शताब्दी खैरे यांनी १0/८/२0२0 रोजी कायदेशीर नोटीस बजवली आहे .अशी माहिती येथील मिटिंग मध्ये समाज क्रांती आघाडचे राज्य उपाध्यक्ष मारोतराव लोखंडे यांनी दिली . मारोतराव लोखंडे यांनी पुढे सांगितले की अयोध्येतील रांम मंदिर भुमीपुजंन प्रसंगी उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदिमुळेच रामजन्मभूमीचा प्रश्न सुटला . असे प्रतिपादन केल्याबाबतची माहिती वर्तमान पत्रातून दिनांक ६ आँगस्टला प्रसिद्ध झाली . योगी यांच्या या विधानावरून ९ नोव्हेंबर २0१९ रोजी सुप्रीम कोर्टाने रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा अवमान झाला असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष प्रा.मुकुंद खैरे यांच्या वतीने हायकोर्टाच्या वकील अँड शताब्दी खैरे यांनी दिनांक १0आँगस्टला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

याबाबतची माहिती लोखंडे निवासी यांनी आयोजित समविचारी मिटिंगमध्ये दिली .सुप्रीम कोर्टामध्ये दि.९ नोव्हेंबर २0१९ रोजी रामजन्मभूमी प्रकरणी दिलेल्या निकालाने राममंदिराचा प्रश्न खऱ्या अर्थाने संपुष्टात आला . ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद करून सुप्रीम कोर्टात या प्रकरणात केंद्र सरकारला कुटेही पाटीँ करण्यात आली नाही . हे प्रकरण अलाहाबाद हायकोर्टाच्या आदेशाविरूध्द अपिल प्रकरण म्हणून कोर्टात दाखल झाले होते. असे . राज्य उपाध्यक्ष मारोतराव लोखंडे. चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष सागर बोरकर. जिल्हा सचिव रविकुमार वाघमारे. रूषिभाऊ वाघमारे अध्यक्ष राजूरा. प्रा.भाणुदास पाटील.भिमराव चापले. समिर शेळके . गौतम भसारकर . काशीनाथ सोनटक्के. इश्वर पडवेकर. गणपत पुनेकर राजूरा इत्यादी उपस्थित होते.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …