Breaking News

*वर्धा जिल्ह्यातील 48 हजार 704 शेतकऱ्यांना 433 कोटी ची कर्जमाफी*

*वर्धा जिल्ह्यातील 48 हजार 704 शेतकऱ्यांना 433 कोटी ची कर्जमाफी*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे

*कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली आहे*

वर्धा : कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून कर्जमाफी देण्यात आली आहे.
वर्ध्यातील 48 हजार 704 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. कर्जमाफी देताच जिल्ह्यातील 38 हजार 396 शेतकऱ्यांनी नवीन पीककर्ज घेतले. या शेतकऱ्यांना आतापर्यंत 369 कोटी 96 लाख रुपयांचे पीककर्ज देण्यात आले आहे. एवढंच नव्हे तर यंदाच्या हंगामात जिल्ह्यात 51.87 टक्के पिककर्जाचे वाटप करण्यात आलं आहे.
प्रारंभी काहीशी अडचणीची दिसत असलेली राज्य सरकारची कर्जमाफी कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरली आहे. सरकारकडून महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. त्या काळापासून आतापर्यंत वर्ध्यात शेतकऱ्यांच्या पाच याद्या प्राप्त झाल्या आहेत. यात 53 हजार 514 शेतकरी पात्र ठरले. त्यापैकी 48 हजार 704 शेतकऱ्यांना 433 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …