*वर्धा जिल्हा आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचे स्वागत*

वर्धा प्रतिनिधि-पंकज रोकडे
वर्धा- आज पर्यत वर्धा जिल्हामध्ये एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय जिल्हास्तरावर नोव्हते, जिह्यातील गोरगरीब आदिवासी नागरिकांना नागपूर गाठावे लागत होते तिथे अधिकारी नसल्यास परत यावे लागत होते त्यामुळे अनेक आदिवासी बांधव त्याना मिळणाऱ्या शासकीय लाभापासून वंचित राहत असत अखिल भारतीय आदिवासी विकास परिषेदच्या व राष्ट्रवादी कॉग्रेस पुढाकाराने जिह्यातील आदिवासी नागरिकाची सोय झाली तसेच गेल्या वर्षी पासून नेहमीत प्रकल्प अधिकारी कार्यरत नोव्हते त्यामुळे शासन स्तरावरील विविध योजना थंड बसत्यात पडलेल्या होत्या, परंतु आज दिनांक 28/08/2020 रोजी आदिवासी बाबत पोटतिडक असलेले कर्मट व्यक्तिमत्व श्री . दीपक हेडाउ साहेब यांनी प्रकल्प अधिकारी म्हणुन पदभार सांभाळला अशा कर्तबगार अधिकाऱ्यांचे यांचे स्वागत केले*
यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष
श्री. नामदेवराव मसराम, (से.नी. माजी आयुक्त) गोपालभाऊ मरसकोल्हे,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष,
(राष्ट्रवादी कॉग्रेस आर्वी विधानसभा अध्यक्ष )बव्रुषभ सुनीलराव निस्ताने,राष्ट्रवादी युवक कॉग्रेस विधानसभा अध्यक्ष संजयभाऊ देशमुख,राष्ट्रवादी जेष्ठ नेते विधानसभा क्षेत्र यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज