*सर्व धर्मीय मंदिरे खुली करा*
*आज सर्व धर्मीय मंदिर खुली करावी या साठी संपूर्ण राज्यभर घंटानाद आंदोलन भाजपा तर्फे करण्यात आले*
उपजिल्ह प्रतिनिधि-दुर्गाप्रसाद पांडे
नागपुर- दिनांक 29.08.2020 रोज शनिवारला घंटानांद आंदोलन!
भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष तथा श्री सती अनसूया माता संस्थांचे अध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांच्या नेतृत्वात श्री सती अनसूया माता संस्थान, पारडसिंगा परिसरात घंटानाद आंदोलन सकाळी 11 वा. करण्यात आले.
सर्व कार्यकर्ते व दुकानदार बांधव यांनी महाराष्ट्र राज्यचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान केले की
*”दार उघड उद्धवा दार उघड”*
घंटानाद आंदोलनामध्ये संस्थानचे उपाध्यक्ष धनराजजी बेलसरे, भाजपा काटोल तालुका अध्यक्ष राजेंद्रजी सरोदे, काटोल शहर कार्याध्यक्ष विजय महाजन, काटोल शहर महामंत्री कोमल देशमुख, संस्थानचे विश्वस्त दिवकर सोमकुवर, महेंद्र खंडाईत, सामाजिक कार्यकर्ते प्रकाशजी देशभ्रतार, प्रदीपजी डांगोरे, पारडसिंगा संस्थान परिसरातील दुकानदार बांधव, महिला वर्ग व भाजपा कार्यकर्ते यांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला….
Maharashtra News Media सच की आवाज