*गोठा पडून दोन म्हशी एक गाय मु्त्यू तर तीन गायी जखमी*

*अंदाजे 60 हजाराचे नुकसान*

*केळवद पो.स्टे.हद्दीतील रायबासा शिवारातील घटना*
*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*
*सावनेरः तालुक्यातील केळवद पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रायबासा शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील जनावरांचा गोठा सतत धार पावसाने पडल्यामुळे दोन म्हशी व एक गाय जागीच मेली तीर इतर तीन जनावरे जखमी झाल्याची दुर्दैवी घटना काल रात्रीच्या दरम्यान घडली*
*मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील केळवद पो.स्टे.हद्दीतील रायबासा शिवारातील संजय बेले यांच्या जनावरांचा गोठा भारती काळे यांच्या शेतात असुन सतत धार पावसामुळे सदर गोठा पडल्याने दोन म्हशी व एक गाय गोठ्याच्या मलब्यात दबून मेली तर एक गाय,एक वासरु व एक वघार असे तीन जनावरे जखमी झाले.सदर घटनेची दखल घेत तलाठी व कोतवाल यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळ पंचनामा करुन सदर घटनेत अंदाजे पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे पंचनाम्यात नमुद करुण पुढील कारवाई करीता तहसीलदार सावनेर यांचे कडे रवाना करण्यात आले.*
*एकीकडे शेतकरी बांधव नैसर्गिक आपत्तीस तोऔड देत आपल्या परिवाराची कशीबशी खडगी भरत असून अश्यातच कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग व अश्यातच या अतिवृष्टी मुळे गोठा पडून झालेल्या आकस्मिक नुकसानी मुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांस तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी उप सरपंच सोनू रावसाहेब यांनी केली आहे*
Maharashtra News Media सच की आवाज