Breaking News

*सततच्या पावसाने पीकांची केली नासोडी* *सोयाबीन भुईसपाट तर कपाशीला लागली वाळवी* *शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान*

*सततच्या पावसाने पीकांची केली नासोडी*


*सोयाबीन भुईसपाट तर कपाशीला लागली वाळवी*

*शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले*

*सावनेर ःमागील तीन चार दिवासापासून सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन अस्तव्यस्त झाले आहे.नदी नाले तुडुंब भरुण वाहत आहेत तस शेतीत ही पाणीच पाणी अशी दैनीय अवस्था झाली आहे.*
*या तीन दिवसाच्या अतिवृष्टी व वादळामुळे तालुक्यातील मालेगाव जोगा येथील शेतकऱ्यांच्या कापूस या पिकाचे खूप नुकसान झाले आहे. कापूस हे पीक या प्रकारे उभेच वाळत आहे, तर कर्क्या रोगामुळे हाती येऊ पाहणारे सोयाबीन या पिकाचे पण खूप प्रमाणात नुकसान होऊण अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन चे पीक भुईसपाट झाले आहे.*
*अचानक आलेल्या या आस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य व केन्द्र शासनाने मदतीचा हात देत सरकारने झालेल्या नुकसानाची पाहणी करून त्याचा आढावा घ्यावा व गोरगरीब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकरी शंकरराव मोवाडे, दिवाकर मोवाडे, युवराज मोवाडे, ज्ञानेश्वर रडके, मनोहर बोबडे, भीमराज मोवाडे, नथ्थुजी मोवाडे, प्रकाश मोवाडे, प्रकाश बोबडे, सुरेश कोल्हे, वासुदेव कोल्हेकर, गजानन चौधरी, सुनील ठोंबरे, रामदास बोबडे, शंकर वाढी, शेषराव काकडे आदिंनी केली आहे.


*या स़कटकालीन प्रसंगी शेतकरी बांधवांना तात्काळ मदत न मिळाल्यास त्यांचे परिवारावर उपासमारीची वेळा नाकारता येत नाही.तालुक्यातील मालेगाव जोगा सारखीच स्थिती संपूर्ण तालुक्यातील असुन कन्हान नदीच्या काठी असलेल्या शेतीतील तर चक्क उभी पीकेच पुरात वाहुन गेली कन्हान नदिचा पुर ओसरल्यावरच या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचा आकडा कळू शकेल हे विशेष*

Check Also

*सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी*

🔊 Listen to this *सावनेर शेगाव बस सुरु* *नगराध्यक्षा संजना मंगळे यांनी दाखवली हिरवी झंडी* …