Breaking News

*जिल्हाबंदी समाप्त, ई-पास रद्द*

*जिल्हाबंदी समाप्त, ई-पास रद्द*

😷 राज्यात मार्चपासून सुरु असणारी जिल्हाबंदी उठली असून आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी असलेली ई पासची अटही रद्द करण्यात आली आहे.

👉 केंद्राने अनलॉक- 4 साठी गाईडलाईन्स घोषित केल्यानंतर आज राज्य सरकारनेही मिशन बिगेन अगेन अंतर्गत लॉकडाऊनमध्ये अनेक सवलती घोषित केल्या आहेत.

📣 *’या’ गोष्टी सुरु :*
▪️ ऑनलाईन तसेच डिस्टन्स लर्निंग
▪️ सामान्य दुकाने तसेच दारुची दुकाने
▪️ हॉटेल, लॉज 100 % क्षमतेने होणार सुरु
▪️ सरकारी कार्यालये ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार
▪️ खासगी कार्यालयांमध्ये 30 टक्के कर्मचाऱ्यांसह
▪️ खासगी बस, मिनी बस वाहतुक

🧐 *’या’ गोष्टी बंदच :* सिनेमा ह़ॉल, स्विमिंग पूल, पार्क, थिएटर, बार, ऑडिटोरियम,आंतरराष्ट्रीय विमान प्रवास, मेट्रो सेवा, सामाजिक, राजकीय, खेळ, मनोरंजन, सांस्कृतीक कार्यक्रम इत्यादी गोष्टींवर बंदी कायम आहे.

🚕 *वाहने :*
● टॅक्सी : 1+3 प्रवासी,
● रिक्षा : 1+2 प्रवासी,
● चारचाकी : 1+3 प्रवासी,
● दुचाकी : 1+1 हेल्मेट व मास्क परवानगी

📍 दरम्यान, मिशन बिगेन अगेन अंतर्गत अनेक सवलती देण्यात आल्या असल्या तरी सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …