Breaking News

*बिबीत एकाच दिवशी कोरोनाचे चार रूग्ण तर* *संशयित डेंग्यू ने एकाचा मृत्यू* *गावात डेंग्यू, मलेरियासह अनेक आजारांचे थैमान* *आरोग्य शिबिर घेण्याची ग्रामविकास समितीने तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी*

*बिबीत एकाच दिवशी कोरोनाचे चार रूग्ण तर*

*संशयित डेंग्यू ने एकाचा मृत्यू*

*गावात डेंग्यू, मलेरियासह अनेक आजारांचे थैमान*

*आरोग्य शिबिर घेण्याची ग्रामविकास समितीने
तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी*

कोरपना प्रतिनिधी- गौतम धोटे

कोरपना- तालुक्यातील बिबी गावात रामनगर कॉलनीत एकाच दिवशी कोरोनाचे ४ रूग्ण आढळले आहेत.यामध्ये १ महीला ,२ पुरुष आणि एका ३ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तर, रमेश शिवराम भोयर वय ४७ वर्षीय यांचा संशयीत डेंग्यू आजाराने चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. विशेष म्हणजे अनेक आजारांनी गावात थैमान घातले असून गावातील अनेक नागरिक चंद्रपूर येथील रूग्णालयात उपचार घेत आहे. या अनुषंगाने गावातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात यावी ही मागणी ग्रामविकास समितीचे स्वप्नील झुरमुरे, हबीब शेख , संतोष उपरे, राजेश खनके, भारत आत्राम ,राकेश बोबडे,कार्तिक मोरे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांना भेटून केली.

प्रत्यक्ष भेटीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील टेंभे यांना गावातील आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. तसेच, गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात आणि आरोग्यविषयक उपाययोजन योग्य प्रकारे होत नसल्याचे दिसते. एकंदरीत, गावकरी विविध आजारांनी त्रस्त आहेत. दरम्यान गावात आरोग्य शिबिराचे आयोजन शासनाने करावे अशी मागणी निवेदनातून
ग्रामविकास समितीचे संतोष उपरे, सप्नील झुरमुरे,हबीब शेख,राजेश खनके,भारत आत्राम, राकेश बोबडे,कार्तिक मोरे आदींनी केली आहे.

बिबी गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. कचऱ्याचे ढीग, घनकच-याचे चुकीचे व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत योग्य उपायोजना करीत नसल्याने नागरिकांना अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. गावातील एका व्यक्तीचा बळी गेला असून अनेक जण गडचांदुर, बल्लारशाह व चंद्रपूर येथे उपचार घेत आहेत. आरोग्याच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याने बिबी गावात मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर होणे निकडीचे वाटते. या अनुषंगाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत गावाच्या हितासाठी तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा केली व मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्याची मागणी केली.

– संतोष उपरे

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …