Breaking News

*कृषी अधिकार्यां नी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन योग्य ते मार्गदर्शन करावे!-गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख* *गुलाबी बोंड अळी नियंत्रण अभियान प्रचार रथा ला दखवली हिरवी झंडी*

*कृषी अधिकार्यां नी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन योग्य ते मार्गदर्शन करावे!-गृहमंत्री मंत्री अनिल देशमुख*

*गुलाबी बोंड अळी नियंत्रण अभियान प्रचार रथा ला दखवली हिरवी झंडी*

 उपजिल्हा प्रतिनिधी – दुर्गाप्रसाद पांडे

काटोल-नरखेड तालुक्यामध्ये सोयाबीन, मोसंबी व कपाशी हे प्रमुख पीक आहे. याच पिकांवर शेतकऱ्याचं वार्षिक आर्थिक नियोजन अवलंबुन असते.


पण कोरोना सारख्या महामारीने आर्थिक कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याला खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बोगस बियाण्याचा सामना करावा लागला. त्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले. आता सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे सदर पिकावर चक्रभुंगा-खोडमाशी, पाने खाणारी अळी व बुरशीजन्य रोगामुळे सोयाबीनचे १००% नुकसान झाले आहे. मोसंबीची रातोरात गळ होऊन संपूर्ण मोसंबी खाली येत आहे व मर रोगामुळे कपाशीच पीक सुद्धा हातातून जात आहे.
या करिता या भागाचे आमदार व नामदार अनिल देशमुख यांनी ०५सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता काटोल तालुक्यातील कुकडी पांजरा येथील शेतकर्यांच्या थेट शातावर पोहचूनया भागातील पाहणी केली-तसेच जिल्ह्यात प्रादेशिक फळसंशोधन केंद्र (वंडली)रिधोरा येथे पोहचून उपस्थित शेतकरी व अधिकार्यांशी संपर्क साधला व कपाशी या पीकावरील बोंडअळी निर्मुलन जनजागृती रथाला हिरवी झंडी दाखवून हा बोंडअळी निर्मुलन जनजागृती रथाला रवाना केले. या प्रसंगी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ व्हि एम भाले, एग्रोव्हिजन फौंडेशन चे वरिष्ठ अधिकारी डाॅ माही, नागपुर जि प चे माजी अध्यक्ष रमेश मानकर, जि प सदस्य चंद्रशेखर कोल्हे, समीर उमप, काटोल पंचायत समिती सभापती उप सभापती , पं सदस्य तसेच पि के व्ही चे वरिष्ठ अधिकार्यां सह काटोल भागातील शेतकरी कोव्हिड १९चे निशा निर्देशाचे पालन करत उपस्थित होते.


या प्रसंगी काटोल तालुक्यातील सोयाबीन व संत्रा व मोसंबी पीकावरील झालेल्या विविध आजारांचे प्रादुर्भावाखाली असलेले पीकाची माहीती काटोल उपविभागीय कृषी अधीकारी विजय निमजे तालुका कृषी अधिकारी सुरेश कन्नाके यांनी नामदार देशमुख यांना दिली.
सोबतच या भागातील जन प्रतिनिधी व शेतकरी बचाब संघटनांनी सुद्धा सोयाबीन , मोसंबी संत्रा पीकाच्या नुकसानी ची भरपाई देण्याची मागणी केली केली आहे

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …