Breaking News

*BRSP जिल्हा चंद्रपूर आणी BRSP युवा आघाडी चा दणका* *थकित मोबदला न दिल्यास तिव्रतेने आंदोलन केले जाईल*

*BRSP जिल्हा चंद्रपूर आणी BRSP युवा आघाडी चा दणका*

*थकित मोबदला न दिल्यास तिव्रतेने आंदोलन केले जाईल*

कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे

कोरपना :- संविधान तज्ञ , BRSP राष्ट्रीय अध्यक्ष ऍड डॉ सुरेश माने सर च्या मार्गदर्शनाखाली , चंद्रपूर वेकोली खान कर्मचारी व कामगारांना थकीत मोबदला जर दिला नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल.

मागील 7 महिन्यापेक्षा ही कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता वेकोली (WCL)कर्मचारी आपली सेवा देत आहेत. मात्र त्यांच्या सेवेचा योग्य सन्मान करण्याऐवजी या कोरोना काळात आपली सेवा देणाऱ्या खान कर्मचारी व कामगारांना त्यांच्या हक्काच्या बुधवार रेस्ट च्या दिवशीच्या कामाचा मोबदला मागील मार्च 2020 पासून त्यांना दिला गेलेला नाही.
मागील राज्याच्या विधानसभा व देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ज्या खान कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामाला लावले गेले त्यांचे निवडणूक कामाचे बिल अजूनही वेकोली प्रशासनाद्वारे दिले गेले नाही त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण झाले आहे.

उपरोक्त विषयास अनुसरून चंद्रपूर #जिल्हाधिकारी यांना तसेच #वेकोली( WCL ) #मुख्य #प्रबंधक ( G M ) यांना #BRSP तर्फे #निवेदन देण्यात आले.

उपस्थिती
BRSP जिल्हाध्यक्ष- जे डी रामटेके
BRSP युवा आघाडी जिल्हाध्यक्ष- मोंटो मानकर
BRSP युवा आघाडी विधानसभा अध्यक्ष- महेंद्र झाडे
BRSP चंद्रपूर शहर अध्यक्ष- विशाल रंगारी
BRSP चंद्रपूर विधानसभा महासचिव – अमोल जुनघरे
महेंद्र रामटेके

वेकोली कर्मचारी व कामगारांना बुधवार रेस्ट चा थकीत मोबदला तसेच निवडणूक कामाचा निश्चित मोबदला तत्काळ संबंधित कर्मचारी व कामगारांना देण्यात यावे अन्यथा BRSP तर्फे व युवा आघाडी तर्फे तीव्र आंदोलन केले जाईल .

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …