मुख्य संपादक किशोर ढूंढेले

केळवद – येथिल पोलीसांनी दिनांक ४/९/२०२०ला नागपुर — पाढुर्णां महामार्गावर मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारावर सावळी फाटा येथे नाकाबंदी करीत मध्यप्रदेश येथुन येणार्‍या वाहन क्र.एम .एच.३१ सी आर .२८९० या वाहनाला थांबविले असता वाहन चालकांने पोलीसांना चकमा देत पळ काढला ,पोलीसांनी या वाहनाचा पाठलाग करीत केळवद पोलीस स्टेशन जवळ या वाहनाला ताब्यात घेतले असता,वाहनाची तपासनी केलि असता वाहनातुन ३५ बाॅक्स विदेशी गोवा कंपनीची दारु आढळुन आली.वाहन चालक विवेक कुलदिप वय २४, पवन रवी बञा,वय २३ दोघे रा.सुफेला कोका छत्तीसगड यांना अटक करीत दोन लाख सत्ताविस हजार कीमंतीची दारु,वाहनाची कीमंत चार लाख असा एकुण सहा लाख सत्ताविस हजाराचा ऐवज जप्त करीत महाराष्ट्र दारु बंदी कायद्दा अतंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाही ठाणेदार सुरेश मट्टामी यांच्यासह पोलीस शिपाई राजेंद्र रेवतकर,गुणवंता डाखोळे,प्रल्हाद चौधरी,सचिन येलकर,अरविदं ठाकरे,राणासिंग ठाकुर यांनी केली.