Breaking News

*रात्रीचे 2 वाजता वरोरा येथिल नागरिक रस्त्यावर* *नागरिकांच रात्रभर जागरण*

*रात्रीचे 2 वाजता वरोरा येथिल नागरिक रस्त्यावर*

*नागरिकांच रात्रभर जागरण*

वरोरा प्रतिनिधी जुबेर शेख

वरोरा- माढेळी चौकातील चौरास्ता छोटा असल्याने या भागात गाडी पलटण्यासाठी अडचण जाते तरीही या भागातून वाहतूक सुरू आहे. वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक5- 6 शिवाजी वॉर्ड येथून एकोना कोल माईंन्स चा कोळसा वाहतूक करणारे ट्रक मागील 2 वर्षांपासून वाहतूक करीत आहे .या कोळसा वाहतुकीमुळे या भागातील रस्ता पूर्णपणे उखडलेला आहे त्यामुळे या भागातील नागरिकांना श्वसनाचे आजार ,त्वचेचे आजार सारख्या समस्याना सामोरे जावे लागत आहे.

यासाठी या भागातील नागरिकांनी सादर निवेदन उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी ,नगराध्यक्ष याना 03/09/2020 ला निवेदन देण्यात आले होते.परंतु या वर कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने आज या भागातील सर्व नागरिक रस्त्यावर उतरले आहे.नागरिकांनी या वेळी एकूण 12 वाहने रोखुन धरले .तसेच एकोना कोलमाईन्स मध्ये अजून वाहने थांबून असल्याची माहिती आहे.तसेच जो पर्यंत ही वाहतूक बंद होत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून हटणार नाही असा पवित्रा या नागरिकांनी घेतला आहे .

अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेशजी पांडे यांनी रात्रीचे 2.36 ला येऊन मध्यस्थी करून उद्या ऑफिस ला उपविभागीय अधिकारी यांच्यासोबत मीटिंग करून प्रश्न सोडवू असे तोंडी आश्वासन दिले.या नागरिकांनी कोळसावाहतुकीचे ट्रक सोडण्यास मनाई केली व वाहने बाजूला घेऊन वाहतुकीला अडचण होऊ न देता आंदोलन करण्यात आले.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …