*भाजपाचे नरखेड तहसीलदार ना निवेदन*
प्रतिनिधी नरखेड तालुका श्रीकांत मालधुरे व सोबत पवन कंळबे जलालखेडा
नरखेड- तालुक्यात माजी उर्जा मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नुकसान ग्रस्त पिकाची पाहणी लवकर नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक होईल*
*नरखेड तालुक्यातील जामगाव फाटा येथील शेतकरी रमेश जुगसेनिया यांच्या मोसंबी पिकाची पाहणी तसेच सोयाबीन , कपाशी पिकाची सुध्दा पाहणी*
*शेतकरी बांधवांवर उद्भवलेल्या संकट व विविध खालील मागण्याकरिता*
1)अतिवृष्टीमुळे व महापुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे त्वरित सर्व्हेक्षण करण्यात यावे
2) सोयाबिन वरील मोझक तसेच इतर रोगांच्या कीड प्रादुर्भाव मुळे व संत्रा मोसंबी फळगळतीने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण व पंचनामे करण्यात यावे.
3) अतिवृष्टीमुळे, महापूर, किडीचा प्रादुर्भाव मुळे झालेल्या सर्व पिकांच्या नुकसान भरपाई पोटी आपण बांधावर जाऊन बोलल्याप्रमाणे सरसकट प्रति हेक्टरी 50 हजार रुपये देण्यात यावे.
4) महापुरात झालेल्या घरांच्या पडझडी करिता व घरातील सामानाच्या नुकसानी पोटी रु 25 हजार व खावटीची मदत द्यावी.
5) महापुरातील आपदग्रस्तांना सोलापूर व कोल्हापूर महापुराच्या धर्तीवर त्यावेळी दिलेल्या मदतीचे निकष लावण्यात यावे.
6) जनावरांवर आलेल्या रोगांवर त्वरित लसीकरण करण्यात यावे
*या मागण्यांकरिता काटोल आणि नरखेड तहसीलदारं मार्फत मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे*
नरखेड तालुक्यात यावर्षी शेतकऱ्यांना बोगस बियाणे मिळाल्याने चांगलेच संकट ओढवले आहे,पण अजून पर्यंत शासना कडून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या बीज कंपनीवर कोणतीही कारवाही,झालेली दिसत नाही.
सोयाबीन पिकावर खोडकिडा रोग गेला असुन सोयाबीन ला शेंगा सुध्दा लागलेल्या नाही त्यामुळे सोयाबीन पिक हे शेतकऱ्यांच्या हाताचे गेले आहे तर कपाशी वर सुध्दा मर रोगाचा प्रादुर्भाव झाला असुन कपाशी सुध्दा पिवळी पडून जमीनदोस्त होत असुन तर काही भागात पाणी साचल्याने कपाशी पिवळी खपडत आहे त्यामुळे शेतकरी वर्ग चांगलाच चिंताग्रस्त झालेला आहे
नरखेड तालुक्यातील भरपूर संत्रा/मोसंबी उत्पादक शेतकरी सुध्दा संकटात सापडल्याने चांगलेच संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे मोसंबी व संत्रा या पिकावर बुरशीजन्य रोग आल्यामुळे त्या झाडाचे फळ गडुन जमीनदोस्त झाली आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे कंबरडे पूर्णपणे मोडले आहे.
यासपुर्ण पिकाची आज पाहणी महाराष्ट्र राज्याचे माजी उर्जा मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मा.चंदशेखर बावनकुळे यांनी आज नरखेड तालुक्यातील संपुर्ण नुकसान झालेल्या पिकाची पाहणी केली असुन नरखेड चे तहसीलदार हरीश गाडे यांना निवेदन दिले तर यावेळी
भाजपा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री व माजी पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे,प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ राजीवजी पोतदार,जिल्हाध्यक्ष अरविंदजी गजभिये नागपूर जिल्हा उपाध्यक्ष चरणसिंग ठाकुर ,संदीप सरोदे जिल्हाध्यक्ष किसान आघाडी भारतीय जनता पार्टी , महामंत्री – किशोरजी रेवरकर, अविनाश खळतकर,अजय बोढारे,इमेश्वरजी यावलकर,उकेश चव्हाण,आदर्श पटले,प्रतिभाताई गवळी,रवी माळोदे, दिलेश ठाकरे,दिवाकर गांजरे ,विष्णुजी चरपे , शामरावजी बारई,विजय महाजन , किशोर गाढवे,सुरेशजी खसारे, इस्माईलजी बारुदवाले,सुनीलजी कोरडे, मनोजजी कोरडे, धनराजजी खोडे, संजयजी कामडे, प्रशांतजी खुलसंगे, किशोरी काहाते, माधुरी बांदरे, उज्वला बघाडे, कविता सुरेश शेंद्रे,निर्मला विरुडकर, वैशाली चाफेकर,भाजपा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख कपिलजी आदमने येथील प्रमुख कार्यकर्ते व शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते,