*महाराष्ट्र न्यूज़ मीडिया टीम ला “प्रथम वर्धपान” दिनाच्या मंगलमय शुभेच्छा- किशोर ढूंढेले (मुख्य संपादक)*)

*पहिल्या वर्धापनदिन निमित्त*

*संपादकीय*

*महाराष्ट्र न्युज मीडिया च्या सर्व आप्त परिवाराचे मनपुर्वक आभार…*

*मीत्रो मी किशोर ढुंढेले मागील जवळपास तीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्य करत आहे साप्ताहिक, सांध्य दैनिक ते दैनिक वर्तमानपत्र असा निरंतर प्रवास व त्या प्रवासातील अनुभवामुळे माझ्या व्यक्तिमत्वाचा व लेखनीचा विकास व परिपक्वतेमुळे खुप काही शिकायला मिळाले.संपादक क्षेत्रातील नामवंत ख्यातीप्राप्त वरिष्ठ पत्रकार व समाजसेवी स्व.उमेशबाबू चौबे,मराठी वर्तमान पत्राला दिशा देणारे आधारस्तंभ आ.ल.त्र.जोशी सर,शैलेश पांडे सर,बळकु्ष्ण कुळकर्णी सर,रमेश कुळकर्णी सर,अनंत कोळमकर सर,अजय अलकलपल्लीवार सर,मनिष गडेकर सर,गोपाल कडुकर सर,संघपाल गडलींग सर सारख्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारिता करण्याचे सौभाग्य मला प्राप्त झाले.*

*वेळ झपाट्याने बदलत होता व प्रिंट मीडिया मधे कार्य करतांना खुप तान वाढु लागला.ऐकीकडे स्वार्थी तत्वे पत्रकारितेत हावी होत होती तर दुसरीकडे आपल्या बातम्या प्रकाशित करवून घेण्याकरिता जिल्हा प्रतिनिधी अथवा जिल्हा संपादकांची जी हुजूरी याउपर लाखोच्या जाहिराती देऊणही ग्रामीण पत्रकारांना मीळणारी दुय्यम दर्जाची वागणूक यात आपल्यातील खरा पत्रकार कुठेतरी हिरावनार तर नाही ना,आपल्या विचारांना आपल्या लेखनीतुन मांडण्यात कुठेतरी दडपण येत असल्याची चाहुल यासर्वांचे व्दंद मनात सुरु असतांना अजय अलकलपल्लीवार सर,रितेष बोरकर सर,अभिषेक सींग सर आदिंच्या विनंतीमुळे प्रिंट मीडिया सोबतच स्क्रीन मीडिया कडे वळून आपल्यात लपलेल्या कौशल्याशी न्याय करण्याचा यशस्वी प्रयत्न*

*स्क्रीन मीडिया वर मोजक्या व मोठ्याच बातम्या अपेक्षित असतात अश्यातच सोशल मीडियाचे पर्व सुरु झाले.लोकांकरिता खुप झाले लेखन आता आपल्या स्वतंत्र विचारसरनी व हक्काचे व्यासपीठावर कार्य करावे असा विचार घेऊण सोबतचे काही पत्रकार मीत्रांना सोबत घेऊण स्वतःचे काहीतरी करावे याकरिता प्रयत्न सुरु झाले याकार्यास महत्वाची साथ लाभली ती योगेश कोरडे भाऊंची व स्वतःचे पोर्टल सुरु करण्याचा निर्णय घेत केन्द्रीय सुचना प्रसारण मंत्रालयाच्या मान्यता मिळवून “महाराष्ट्र न्युज चँनल” या नावाने 09 सप्टेंबर 2019 ला स्वतःच्या सोशल बेवसाईड पोर्टल ची वाटचाल सुरु झाली*

*हळूहळू सावनेर सह कळमेश्वर, कामठी,रामटेक, पारशिवनी,नरखेड,काटोल, कुही,मौदा अश्या नागपूर जिल्ह्यातील तालुक्यातील प्रतिनिधी जुडू लागले संपूर्ण महाराष्ट्र न्युज मीडिया प्रबंधनाकडून दर्जेदार बातम्या प्रकाशित होऊ लागल्या महाराष्ट्र न्युज मीडियावर प्रकाशित बातम्यामुळे वाचक वर्ग वाढु लागला नागपूर जिल्ह्यासोबतच वर्धा,अमरावती,भंडारा,गडचिरोली,चंद्रपूर,येवतमाळ,बुलढाणा,नाशिक,इत्यादी जिल्ह्यातील प्रतिनिधींनी महाराष्ट्र न्युज मीडिया वर विश्वास करुण बातम्या पाठवायला सुरुवात केली व फक्त एक वर्षाच्या छोट्याश्या प्रवासात 15 लक्ष व्हिवर्स,वाचकांचा परिवार पाठीशी उभा होऊण आशीर्वाद देऊ लागला*

*संपादकीय, व्यवस्थापन व प्रतिनिधींचे आपसी समन्वयामुळेच आज हे शक्य झाले.या एक वर्षाच्या कालावधीत अनेक युवकांना पत्रकारिता क्षेत्रात प्राधान्य देऊण समाजात मानाचे स्थान देत त्यांच्या सामाजिक दाईत्वाची जान त्यांना करुण पत्रकारितेच्या क्षेत्रात रुची निर्माण करण्याचे ही सौभाग्य महाराष्ट्र न्युज मीडियाच्या माध्यमातून करण्याचे यश प्राप्त झाले*

*मागील या एक वर्षात अनेक बरे वाईट अनुभव पदरी पडले त्यातून चांगले विचार, चांगले व्यक्तिमत्त्वावर पुढील प्रवास अत्यंत चांगल्या प्रकारे सुरु आहे.महाराष्ट्र न्युज मीडिया च्या लोकप्रियतेच्या या प्रवासात महाराष्ट्र न्युज मीडिया परिवारातील संपादकीय, व्यवस्थापन प्रबंघक व प्रतिनिधींच्या दर्जेदार बातम्यांना हातोहात घेणाऱ्या वाचकांच्या विश्वासावर खरे उतरून जनसामान्यांना त्यांच्या हक्काचे मंच व स्वतंत्र लेखनीची मुभा उपलब्ध करुण देणाऱ्या महाराष्ट्र न्युज मीडियाचा पहिला वर्धापन दिन आपण सर्वांच्या उपस्थितीत साजरा करण्याचा आनंद काही औरच…*

*सांध्य दैनिका पासुन सुरु केलेला पत्रकारितेचा हा प्रवास आपण सर्वाच्या विश्वासाने मुख्य संपादक महाराष्ट्र न्युज मीडिया “पोर्टल” पर्यंत पोहचण्यामागे फक्त आपण सर्वांचा आशीर्वाद व श्री शमीविघ्नेशाची कु्पा*

*आपण सर्वांकडून मीळालेले विश्वासपुर्ण सहकार्याचा सदैव ऋणी….*

*किशोर ढुंढेले*
*मुख्य संपादक*
*महाराष्ट्र न्युज मीडिया*

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …