*धनगर समाज बांधवाचा रोष बघून अखेर अटल बालाजी कंपनी ने मागितली माफी*

*धनगर समाज बांधवाचा रोष बघून अखेर अटल बालाजी कंपनी ने मागितली माफी*

वरोरा प्रतिनिधी जुबेर शेख

वरोरा- वादग्रस्त अभिनेत्री एकता कपूर वर्जिन भास्कर 2च्या वेब सिरीज मध्ये अहिल्याबाई महिला छात्रावास असा बोर्ड दाखवण्यात आल्याने अटल बालाजी शो कंपनी सह अभिनेत्री एकता कपूर च्या विरोधात संपूर्ण देशभरातून संतापाची लाट उसळली होती. तसेच धनगर समाजामध्ये खूप संतापाचे वातावरण निर्माण तयार झाले होते.
सगळ्या समाजबांधवांनी या घटनेचा निषेध केला होता. वर्जिन भास्कर टू वेब सिरीज सिरीयल मधून अहिल्याबाई महिला छात्रावास हा बोर्ड काढण्यात यावी म्हणून धनगर समाजातील नेते भूषण सिहं राजे होळकर, प्रकाश अण्णा शेंडगे, रामभाऊ लांडे, वामन भाऊ तुर्के, विशाल धायगुडे, राजू झुंझे, निवांत कोळकेर, dr. विकास महात्मे, नवनाथजी ढगे, प्रकाश कोकरे, माधवजी गडदे, आदिनाथ बंडगर, गणेश चिडे, अतुल भाऊ भुयार , बापूसाहेब शिंदे, यशवंत सेना , मल्हार सेना, धनगर युवा सेना, देशातील राजकीय पक्षांनी अटल बालाजी टेलिफिल्म्स कंपनी शो विरोधात सरकारकडे लेखी पत्रासह ठीक ठिकाणी पोलीस स्टेशनन मदे तक्रार देण्यात आली तसेंच इंदोर शहरात एकता कपूर च्या पुतळयाला जोडे मारून आंदोलन करण्यात आले. देशात आग्रा, मथुरा, दिल्ली, उदयपूर, लखनऊ, भरतपूर, मंद सूर येथे एकता कपूर विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्र राज्यात यशवंत सेनेनी उग्र आंदोलन करून एकता कपूर ने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली. सतत सलग तीन दिवस धनगर समाजाचा रोष बघून अटलबालाजी कंपनी ने अखेर माफीनामा सादर करीत नकळत भावना दुखावल्याची कबुली दिली. आणि कोणत्याच महापुरुषांचंच कुठेही गैर वापर करणार नाही अशी ग्वाही दिली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …