*राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) कोंढाळीत ही परिक्षा केंद्र* *600 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र येथे आहे!*

*राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) कोंढाळीत ही परिक्षा केंद्र*

*600 विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र येथे आहे!*

 

विशेष प्रतिनिधि
कोंढाळी- 13 सप्टेंबर रोजी लखोटिया भूतडा सीबीएसई हायस्कूलमध्ये राष्ट्रीय पात्रता प्रवेश (NEET) परीक्षेचे केंद्र देण्यात आले आहे. येथील परीक्षा केंद्रावर600 विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक परिक्षा खोलीत 12 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली आहे. यासाठी 50 परिक्षा वर्ग खोल्या असून परिक्षेचे वेळी 150 निरक्षरांची उपस्थिती राहणार आहे. सध्या कोव्हिड 19ची साथ सुरू आहे, या करीता बचावात्मक उपाययोजना साठी स्थानिक पोलिस, आरोग्य, ग्रामपंचायत, व वीज अधिकारी यांची सीबीएसई हायस्कूलच्या प्राचार्य ज्योती राऊत यांनी बैठक घेऊन कोविड 19 च्या नियमांचे पालन करण्या करीता जन सहकार्याचे आवाहन केले. यावेळी परीक्षार्थी, परिक्षा निरिक्षक यांची आरोग्य तपासनी, वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था, शालेय जागेची स्वच्छता व सैनिटरायझेशन करने वीज व्यवस्था बरोबर रहावी या सर्वा करीता सहकार्य लाभावे म्हणून सहकार्य मिळावे या करीता बैठकी चे आयोजन केले होते. या प्रसंगी सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ सुनील येरमल, अशोक गणवीर, रुपाली तिडके, कोंढरी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक राम ढगे, लाखोटिया भुताडा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश सेम्बेकर, वीज उप विभाग अधिकारी अशोक गाणार, यांची उपस्थिती होती अशी माहिती प्राचार्य ज्योती राऊत यांनी स्थानिक पत्रकारांना दिली.

Check Also

*असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की मांग*

🔊 Listen to this *असंवेदनशील सरकार का निषेध* *बदलापूर पीडीताको न्याय दो शिवसेना (उबाठा) की …