*कळमेश्वर येथे दिवंगत पत्रकारांना वाहिली श्रध्दांजली*
कळमेश्वर प्रतिनिधि
कळमेश्वर : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष माणिक वैद्य ,माथेरान येथील पत्रकार, मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार,वाडी येथील पत्रकार सुनील शेट्टी आणि राज्यात गेल्या महिनाभरात मृत्यूमुखी पडलेल्या 19 पत्रकारांना आज कळमेश्वर तालुक्यातील पत्रकारांनी श्रद्धांजली अर्पण केली..
गेल्या महिनाभरात राज्यात 20 पत्रकारांचे निधन झाले आहे.. 4 दिवसाआधी नरखेड चे माणिक वैद्य आणि काल सुनील शेट्टी तसेच नितीन पाचघरे,सागर जाधव व मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस संतोष पवार यांचे अकाली निधन झाले..राज्यातील पत्रकारांसाठी हा मोठा थक्का आहे. परिषदेने संतोष पवार आणि अन्य दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी आज राज्यभर श्रध्दांजली सभांचे आयोजन केलं होतं.. त्यानुसार स्थानिक विश्राम गृह येथे ज्येष्ठ पत्रकार पुंडलिक धार्मिक यांच्या अध्यक्षतेखाली श्रध्दांजली सभा घेऊन कळमेश्वरातील पत्रकारांनी दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहिली.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष योगेश कोरडे,राहुल अंजनकर,डॉ संदीप भुयार, आशिष सौदागर,जयंत अढाऊ,आनंद खत्री, मनोज क्षीरसागर सह अन्य पत्रकार उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज