*नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान झालेल्या शेतकर्यांच्या पीकांचे पंचनाम्याचे आदेश*
कोंढाळी प्रतिनीधी
कोंढाळी- ऑगष्ट २०२० मधे झालेल्या सततच्या पावसामुळे सोयाबीन पिक पिवळी पडणे,या पिकावर खोड किडा,तुडतुडे, चक्रीभूंगा,या किडींसह विषाणूजन्य पिवळा मोजक्या, बुरशीजन्य मुळकूज,खोडकुज,या रोगांचा प्रादुर्भाव असल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच अंबीया बहार संत्रा व मोसंबी वर ब्राऊन राट चर्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणावर संत्रा -मोसंबी फळांची फळ गळ झाली आहे. या बाबद ची माहीती काटोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार व राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख खुद काटोल-नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांचे शेतांमध्ये कृषीपीक तज्ञ व कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पोहचून पीकांची पाहणी केली होती. या पीकांचे विविध रोगांमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नागपूर यांचे कार्यालयीन पत्र दिनांक_०९-०९-२०२०रोजी पत्र क्रमांक राजस्व/बक/कावी-५५७/२०२०अन्वये पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
या आदेशानुसार काटोल तहसील कार्यालयातून पत्र क्र- /ता/का-/कावी/445 तहसीलदार अजय चरडे यांनी काटोल चे खंड विकास अधिकारी, काटोल/कोंढाळी चे नायब तहसीलदार-/काटोल तहसील कृषी अधिकारी तसेच काटोल तहसील अंतर्गत येनारी कोंढाळी, मेटपांजरा, पारडसिंगा, तसेच येनवा जि प सर्व चे कृषी मंडळ अधीकारी यांना पत्र देऊन पिकांचे नुकसानी चे पंचनामे करने करिता संबधीत गावांचे सरपंच, पोलिस पाटील, यांचे समक्ष संबधीत गावांचे कृषी सहायक, ग्राम अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम पंचायत सचीव, यांनी संयुक्त पंचनामे करावे तसेच पंचनामा करते वेळी कोणतेही शेतकरी मदतीपासुन वंचीत राहू नये याची दक्षता घ्यावी व केलेले संयुक्त पंचनामे 12सप्टेंबर पर्यंत तालुका कार्यालयात पोहचवावे असे आदेश तहसीलदार अजय चरडे यांनी दिले आहे.
Maharashtra News Media सच की आवाज