*महिला सरपंचाच्या अस्मितेसाठी लढणाऱ्या केदार गटाने केला पायउतार करण्याचा प्रयत्न*

*अविश्वास ठराव एका मताने पडला*
*राजकीय वर्तुळात खळबळ*
*खापरखेडा प्रतिनिधी*
खापरखेड़ा- मागील विधानसभा निवडणुकीत महिला सरपंचाच्या अस्मितेसाठी लढा देण्याऱ्या केदार गटाने सिल्लेवाडा ग्रामपंचायतच्या दलित महिला सरपंचाला पायउतार करण्याचा प्रयत्न केला पायउतार करण्यासाठी संपूर्ण राजकीत ताकदपणाला लावली मात्र एका मताच्या अंतराने अविश्वास ठराव पडला एकाएकी बलाढ्य केदार गट तोंडघशी पडल्यामूळे त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सावनेर पंचायत समिती अंतर्गत असलेल्या वलनी जि.प.सर्कल परिसरातील सिल्लेवाडा ग्रामपंचायत मध्ये मागील अनेक वर्षांपासून केदार गटाची सत्ता होती मात्र नोव्हेंबर २०१७ रोजी झालेल्या सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बसपा समर्पित सरपंच प्रमिला बागडे ह्या जनतेतून थेट निवडून आल्या सदर ग्रामपंचायत भाजप समर्पित ४ व केदार गटाचे ११ ग्रामपंचायत सदस्य निवडून आले आहे एका वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत सिल्लेवाडा ग्रामपंचायतच्या सरपंच प्रमिला बागडे यांच्या विरुद्ध काही ग्रामपंचायत सदस्यांनी अपमानजनक शब्दांचा वापर केला विधानसभा निवडणूक आयत कोलित केदार गटाला मिळालामूळे त्यांनी महिला सरपंचाचा अस्मितेचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला यावेळी मोठया प्रमाणात वादळ उठले भाजप व केदार गट आमने-सामने झालेत राज्यात सुनील केदार पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री झालेत शेवटी महिला सरपंचाचा अस्मितेचा मुद्दा बाजूला सारत सरपंच प्रमिला बागडे यांच्या विरुद्ध केदार गटाने विविध कारने देऊन ४ सप्टेंबरला अविश्वास प्रस्ताव मांडला सावनेरचे तहसीलदार दिपक करांडे यांनी ११ सप्टेंबरला विशेष सभेचे आयोजन केले यावेळी विस्तृत चर्चा करण्यात आली हात उंच करून मतदान करण्याचे जाहीर करण्यात आले विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ५ तर अविश्वास दर्शक ठरावाच्या बाजूने ११ मते पडलीत १ मताने अविश्वास ठराव पडला विधान सभा निवडणुकीत दलित महिला सरपंचाचा अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून राजकीय पोळी शिकण्यात आली मात्र आता केदार गटाकडून आणलेला अविश्वास ठराव पडल्यामूळे एका दलित महिला सरपंचाचा विजय झाल्याची चर्चा सिल्लेवाडा परिसरात चांगलीच रंगली असून अविश्वास ठरावावेळी भाजप समर्पित ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच प्रमिला बागडे यांच्या बाजूने मतदान केल्याने केदार गटाला अविश्वास ठराव जिंकता आला नाही.
Maharashtra News Media सच की आवाज