Breaking News

*धक्कादायक! चंद्रपुरात शासकीय व खासगी रुग्णालये कोरोनाने फुल्ल बेड कमी रुग्ण अधिक कोरोना रुग्णांची बेडसाठी धडपड*

*धक्कादायक! चंद्रपुरात शासकीय व खासगी रुग्णालये कोरोनाने फुल्ल बेड कमी रुग्ण अधिक कोरोना रुग्णांची बेडसाठी धडपड*

वरोरा प्रतिनिधि जुबेर शेख
चंद्रपूर- बघता बघता  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 5 हजारांच्या घरात गेली आहे. आणखी रुग्णसंख्येत झपाट्याने वाढच होत आहे. रुग्णांना ठेवण्यासाठी आता जागाच शिल्लक न राहिल्याने जिल्हा प्रशासनाने होम आयसोलेशनचा पर्याय पुढे आणला.
प्रकृती बिघडल्यानंतर कोरोनाचे निदान झालेल्या रुग्णांना कोविड-19 सेंटरमध्ये ठेवले जात आहे. आजघडीला सर्व शासकीय व खासगी रुग्णालये फुल्लं झाली आहे. रुग्ण वाढीचा हा दर कायम राहिल्यास गंभीर स्थितीतील रुग्णांना ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण होण्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी व्यक्त करीत आहे.
शुक्रवारी रुग्णांचा आकडा 5 हजार वर गेला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा वाढीवरच आहे. जनसंपकार्तून कोरोनाचा प्रसार गतीने होत आहे. चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरात चार दिवसांचा जनता कर्फ्यू सुरू आहे. याचा काही परिणाम दिसून येतील, परंतु त्यानंतर नागरिकांनी मास्क न लावता बाहेर पडणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळले नाही तर कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतील.
या वाढत्या रुग्णांसाठी खाटांची व्यवस्था करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेपुढे निर्माण झाले आहे. चंद्रपूरात सामान्य रुग्णालय व शासकीय वेद्यकीय महाविद्यालयांमध्ये वेंटीलेटर आॅक्सिजनची व्यवस्था आहे. या ठिकाणी गंभीर स्थितीतील कोरोना रुग्णांना ठेवले जात आहे.
पंरतु येथील क्षमतेपेक्षा रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चंद्रपूरातील सुविधा असलेल्या काही खासगी रुग्णालयांचेही कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतरीत करण्यात आले. ही रुग्णालयेही फुल्लं झाल्याने बेडसाठी कोरोना रुग्णांची धडपड सुरू झालेली आहे. नव्या रुग्णांसाठी सोईयुक्त रुग्णालये शोधणे जिल्हा प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे.

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …