Breaking News

*कोरोनाच्या सावटाखाली “NEET” परिक्षा संपन्न* *विद्यार्थी व अभिभावकांनी सोशल डिस्टंसींग चा उडविला फज्जा* *232 केन्द्रावर घेण्यात आली परिक्षा*

*कोरोनाच्या सावटाखाली “NEET” परिक्षा संपन्न*

*विद्यार्थी व अभिभावकांनी सोशल डिस्टंसींग चा उडविला फज्जा*

*232 केन्द्रावर घेण्यात आली परिक्षा*

*मुख्य संपादक किशोर ढुंढेले सोबत सुरज सेलकर*

*सावनेरः  कोरोना च्या वाढत्या सावटाखाली नँशनल इलिजिबीलिटी एन्ट्रन्स टेस्ट “NEET” ची परिक्षा रविवार जिल्ह्यातील 232 सेंटर वर घेण्यात आली याकरिता परिक्षा केन्द्रावर सुरक्षेचे व सोशल डिस्टंसींग चे काटोकोर पणे पालन करण्याचे दिशानिर्देशाचे पालन करणे संर्व केन्द्र संचालकांना बाध्य होते व त्या अनुशंगाने त्यांनी तशी व्यवस्था ही केली होती सकाळी 11-30 पोहचून सोशल डिस्टंसींग पाळत आपले प्रवेश परिक्षा केन्द्रात करने अपेक्षित होते*

*सारस्वत पब्लिक स्कुल येथे 780 तर अरविंद इंडो पब्लिक स्कुल येथे 240 परिक्षार्थी*

*सावनेर शहरालागत आजनी येथील सारस्वत पब्लिक स्कुल आजनी येथे 780 तर अरविंद इंडो पब्लिक स्कुल हेटी येथे 240 परिक्षार्थी परिक्षा देणार असल्याने शाळा प्रशासनाने तशी व्यवस्था करुण ठेवली होती एका रुम मधे सोशल डिस्टंसींग नुसार फक्त 12 परिक्षार्थी यांची आसन व्यवस्था तर कोरोना लागन असलेल्या परिक्षार्थी करीता वेगळे आयसोलेशन कक्ष अश्या व्यवस्थेत नँशनल टेस्टींग एजन्सी (एनटीए) व्दारे पुर्ण खबरदारी घेण्याचे आदेशीत होते*


*परिक्षा केन्द्रावर सोशल डिस्टंसींग पाळणे तसेच “थर्मल स्कँनिंग” मधे उमेदवाराच्या शरिराचे तापमान व इतर लक्षणे कोवीड़ 19 च्या मापदंडापेक्षा अधिक असल्याचे आढळून येताच त्यांना वेगळ्या कक्षात बसविण्याची सोय ही परिक्षा केन्द्रावर करण्यात आली होती*

*परिक्षार्थी व अभिभावकांनी केली परिक्षा केन्द्राबाहेर एकच गर्दी*

*परिक्षा म्हटले की परिक्षार्थी पेक्षा जास्त उत्सुकता अभिभावकांना असते व ते आपल्या मुलांना परिक्षा केन्द्रावर सोडण्याकरिता स्वतः जातात व जोपर्यंत आपला मुलगा परिक्षा केन्द्राच्या आत पर्यंत नजरेच्या आड होत नाही तोवर परिक्षा केन्द्राचे मुख्यव्दार सोडत नाहीत त्यामुळेच इतर विद्यार्थ्यांना परिक्षा केन्द्रात प्रवेश घेण्याकरिता एकमेकांना रेटून निघावे लागते असाच प्रकार या दोन्हीही परिक्षा केन्द्रावर बधावयास मिळाला शाळा प्रशासन व सुरक्षाकर्मीच्या वारंवार विनंतीला ही हुलकावणी देत परिक्षा केन्द्रा पुढे अभिभावकांची गर्दी कमी होण्या ऐवजी वाढतच होती तर परीक्षा केन्द्रा बाहेर अभिभावकांच्या दुचाकी चारचाकी वाहनांमुळे इतर वाहतूक व्यवस्था ही कोलमडून पडली होती हे विशेष…*


*सारस्वत पब्लिक स्कुल परिक्षा केन्द्र क्रमांक 3111204 येथे केन्द्र प्रमुख म्हणून प्राचार्या शिमला सींग व उपकेन्द्र प्रमुख म्हणून संगीता मानकर तसेच 3111230 परिक्षा केन्द्र अरविंद इंडो पब्लिक स्कुल हेटी येथे केन्द्र पर्यवेक्षक डॉ. नरेंद्र नरोले तर केन्द्र प्रमुख प्रा.रामकुमार वर्मा व उपकेंद्र प्रमुख म्हणून निशा चव्हाण यांनी कार्य सांभाळले*

Check Also

*उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त नगरसेवक* *नगराध्यक्षा व नगरउपाध्यक्ष ने बनाया इतिहास*

🔊 Listen to this *उपाध्यक्ष बने राजु घुगल* *डॉ. विजय धोटे व मंदार मंगळे स्विकु्त …