*पुन्हा एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह*
*वरोरा पोलीस स्टेशन मधील घटना*
वरोरा प्रतिनिधि- जुबेर शेख
वरोरा- मागील काही दिवसापूर्वी खांबाडा भागातील एका इसमाला खून करून मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता. व्यक्तिगत स्पर्धेतून सुपारी देऊन विष्णू कष्टी याचा खांबाडा परिसरात निर्दयी खून दोन युवकांना पोलीसानी अटक केली होती.त्यांना वैद्यकीय तपासणी करिता नेले असता त्यापैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चांगलीच तारांबळ उडाली आहे.पोलीस स्टेशन परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.तसेच अत्यावश्यक काम असल्यास पोलीस ठाण्यात यावे अन्यथा येणे टाळावे असे आवाहन ठाणेदार उमेश पाटील यांनी केले आहे.