*कळमेश्वरात खासगी डॉक्टरला मारहाण*

*मास्क घालण्यास सांगितल्याने वाद*
*घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद*
*विशेष प्रतिनिधी*
*कळमेश्वर- रुग्णासोबत आलेल्या व्यक्तीस मास्क घालण्यास सांगितल्यामुळे वाद निर्माण झाला़ या वादातून तीन व्यक्तींनी डॉक्टरला मारहाण केली़ ही घटना स्थानिक पोलिस स्टेशनअंतर्गत एका खासगी रुग्णालयात नुकतीच घडली़*
*सध्या कोरोनाचे दिवस आहे़ कोरोनापासून बचावासाठी सर्वांनी योग्य ते बंधन पाळणे आवश्यक आहे़ यात सामाजिक अंतर व मास्कचा वापर महत्वाचा आहे़ मात्र, काही नागरिक मास्क व सोशल डिस्टिंगचा वापर करीत नसल्याचे सध्या चित्र आहे़ एखाद व्यक्तीने अशा मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीस ते घालण्यास सांगितल्यास वादही होत आहे़ असाच काही प्रकार कळमेश्वर शहरात घडला़ येथील एका खासगी रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरने रुग्णासोबत आलेल्यांना मास्क घालण्यास सांगितल्याने वाद झाला आणी हा वाद विकोपाला गेला़ रुग्णासोबत आलेल्या व्यक्तींनी डॉक्टरला जबर मारहाण केली़ घटनेनंतर या मारहाण झालेल्या डॉक्टरने मारहान करणाऱ्याविरोधात कळमेश्वर पोलिसात तक्रार दिली़*
*मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल*
*सदर मारहाणीची घटना डॉक्टरच्या चेंबरमध्ये लागलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाली़ सध्या हा मारहाणीचा व्हिडिओ शहरात सर्वत्र व्हायरल झाला आहे़ यात आधी एक पुरुष व महिला आपल्या छोट्या मुलीला घेऊन आल्याचे दिसते़ त्यानंतर महिलेसोबत आलेला व्यक्ती व डॉक्टरमध्ये वाद झाला व त्यानंतर हा वाद विकोपास जावून अखेरीस आणखी दोन व्यक्ती तेथे येवून डॉक्टरला मारहाण करीत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे़*
*डॉक्टरकडून तक्रार मागे*
*मारहाण झाल्यानंतर डॉक्टरने मारहाण करणाऱ्यांची कळमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर केली होती़ मात्र, दुसऱ्या दिवशी नोटरी करून ती एफआयआर मागे घेतली़ डॉक्टरने मारहाण झाल्यानंतर एफआयआर मागे का घेतली़ हा सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे़*
*आम्हाला संरक्षण द्या डॉक्टरांची मागणी*
*कोरोनाच्या काळात रुग्णांची सेवा करताना डॉक्टरांना होणाऱ्या मारहाणीचा कळमेश्वर डॉक्टरर्स असोशिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला़ रुग्ण सेवा करतांना डॉक्टरांना संरक्षण मिळावे, भयमुक्त काम करता यावे, समोर अशी घटना घडू नये या मागणीसाठी असोसिएशनच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़ डॉक्टरांना संरक्षण न मिळाल्यास दवाखाने बंद मोहिम राबविण्या येईल व त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा असोसिएशनच्यावीने देण्यात आला़ निवेदन देणाऱ्यामध्ये डॉ.पोतदार, डॉ. आशीष पांडे, डॉ.पल्लवी पांडे, डॉ़ संदीप भुयार, डॉ़ जयंत देशमुख, डॉ़ शिल्पा देशमुख, डॉ़ मनीष सोनुले, डॉक्टर मुकेश साखरे आदिंचा समावेश होता़*
*सदर घटना एकाच राजकीय पक्षाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांचे नातेवाईक असल्याने व सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तक्रारकर्त्याची मानधरनी करुण केलीली तक्रार वापस घेण्यासाठी प्रयत्न झाल्याची चर्चा रंगत आहे*
Maharashtra News Media सच की आवाज