*कोरपना येथील भारत चन्ने ची कोरोनावर मात*
*गडचांदूर येथे फुलांचा वर्षावात स्वागत*
कोरपना प्रतिनिधि – गौतम धोटे
कोरपना – कोरपना येथील रहिवासी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तथा कोरपना भाजपा नेते श्री भारतजी चन्ने यांना दि.०५/०९/२०२० ला कोरोनाची लागण झाली. तेव्हा त्याला तात्काळ चंद्रपूर येथील कोल सिटी हॉस्पिटल मध्ये उपचाराकरिता भरती करण्यात आले.व ते आता पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना दिनांक १६/०९/२०२० ला हॉस्पिटल मधून सुट्टी देण्यात आली व ते आपल्या कोरपना स्वघरी जात असताना गडचांदूर येथील सारंग पेट्रोल पम्पाजवळ भाजपाचे नगरसेवक श्री अरविंदजी डोहे,माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे ,सुनीलजी जोगी,प्रतीक सदनपवार,बबलूजी सिंग,नारायण मेघवंशी, साईनाथ पारखी,तृप्ती पारखी,कल्पना जोगी,मदन बोरकर,अजीम बेग,समय पारखी इत्यादी नागरिक उपस्थित राहून त्यांचेवर फुलांचा वर्षाव करून कोरोना वर मात करून घरी सुखरूप आल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले.व उपस्थित नागरिकांनी प्रेम पाहून चन्ने काही क्षणासाठी भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. भारत चन्ने नि सर्वांचे आभार मानले.उपस्थितांनी त्यांना दिर्घआयुष्या बाबत शुभेछ्या दिल्या.
Maharashtra News Media सच की आवाज