Breaking News

*गडचांदूर येथे भाजपा पक्षातर्फे भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रम संपन्न*

*गडचांदूर येथे भाजपा पक्षातर्फे भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसा निमित्य विविध कार्यक्रम संपन्न*

कोरपना प्रतिनिधि गौतम धोटे

कोरपना :- गडचांदूर येथील भाजपा पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम ये संपन्न करण्यात आले .भारतीय सैन्याचे आधुनिकीकरण ,ऊज्वला गैस योजना ,जनधन योजना ,प्रधानमंत्री सडक योजना,प्रधानमंत्री आवास योजना, किसान सन्मान योजना,ट्रिपल तलाक , स्वच्छ भारत मिशन,वन रैंक वन पेंशन योजना अशा कित्येक लोकप्रिय योजना व देशहितासाठी कठोर निर्णय घेणारे भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदिजीं यांच्या वाढदिवसा निमित्य गडचांदूर येथील कोरोनाच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता प्रतिबंधित उपाय म्हणून ग्रामीण रुग्णालय येथे स्वयंनचलीत सैंनिटायझेर मशीनची गरज लक्षात घेता भाजपचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार यांनी नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.देवराव भाऊ भोंगळे यांना मागणी केली असता अगदी काही तासातच महाराष्ट्राचे विकास पुरुष माजी वित्त नियोजन मंत्री तथा बल्लारपूर चे आमदार मा.सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिली.व सदर मशिन ग्रामीण रुग्णालयात लावून वैधकिय अधिकारी डाँ नामपल्ले यांना जनतेच्या उपयोगाकरिता सुपूर्द करण्यात आले.या प्रसंगी भाजपाचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार,जेष्ठ नेते महेशजी शर्मा,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजीराव सेलोकर,निलेशजी ताजने,हरीश घोरे ,महादेव ऐकरे , नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,इमरान शेख प्रतीक सदनपवार,आदी उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांनी भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबाना भरभरून शुभेछ्या दिला व अवघ्या काही तासातच स्वयंचलीत सैंनिटाइझर मशीन उपलब्ध करून दिल्या बद्दल गडचांदूर येथील भाजपा कार्यकर्त्या कडून तसेच वैद्यकीय स्टॉप तसेच नागरिकांकडून मा सुधीर भाऊंचे आभार मानले
तसेच गडचांदूर येथील भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी तर्फे वृक्षापोपन व ” माझे कुटुंब माझी जबाबदारी ” कोविड मुक्त गडचांदूर मोहिम राबविण्या करिता शपथ घेतली.व देश्याचे लाडके पंत प्रधान मा नरेंद्रजी मोदी साहेबाना वाढदिवसाच्या शुभेछ्या दिल्या.या प्रसंगी गडचांदूर न. प. च्या माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे,सौ निताताई क्षीरसागर ,सौ रंजनाताई मडावी पक्ष्याच्या सक्रिय महिला कार्यकर्त्या सौ अँड.दीपांजली मंथनवार,सौ सपना सेलोकर,सौ संगीता गोरडवार आदी उपस्थित होत्या.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …