*नागपूरमधील मृत्युदर कोणत्याही स्थितीत वाढता कामा नये*
*’शहरात कडक लॉकडाउन करणार नाही, पण शिस्त पाळा…’!*
नागपुर प्रतिनिधि पवन किरपाने
नागपुर- नागपूरमधील मृत्युदर कोणत्याही स्थितीत वाढता कामा नये. वाढत्या रुग्णसंख्येवरही नियंत्रण यावे. प्रत्येक अधिकाऱ्याने दिलेले काम काटेकोरपणे पार पाडावे. पोलिसांनी गर्दी नियंत्रित आणावी’, असे निर्देश देत ‘शहरात कडक लॉकडाउन करणार नाही, पण शिस्त पाळा…’, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात रविवारी आयोजित बैठकीत सांगितले.
करोना नियंत्रणात कसा आणायचा, याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मनपाचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, कोव्हिड-१९च्या नोडल अधिकारी तथा वस्त्रोद्योग संचालक डॉ. माधवी खोडे-चवरे, मिताली सेठी, मनीषा खत्री, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त मिलिंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी आशा पठाण, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, डॉ. अविनाश गावंडे आदी उपस्थित होते