Breaking News

*दहेगावातील शेतकऱ्यांची दिशाभूल कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार*

*दहेगावातील शेतकऱ्यांची दिशाभूल कागदी घोडे नाचवण्याचा प्रकार*

वरोरा प्रतिनिधि -जुबेर शेख
वरोरा- अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन चे नुकसान झाले .सोयाबीन पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे पिकाचे प्रत्यक्षात मौक्यावर जाऊन सर्वेक्षण करून त्यांच्या याद्या कृषी अधिकारी वरोरा यांच्याकडे जमा करण्याचे आदेश असताना दहेगाव येथील तलाठी यांनी शेतकऱ्यांना बँक पासबुक,सातबारा पेरापत्रक जमा करण्याचे सांगण्यात आले असून यात शेतकऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे .या विरोधात दहेगाव येथील सरपंच विशालभाऊ पारखी यांनी तहसीलदार साहेब वरोरा यांना भेट देऊन निवेदन देण्यात आले .कोरोनाच्या काळात देखील शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या या निर्णयानंतर त्यांची तक्रार देण्यात आली.विनाकारण कोणत्याही शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे एक पत्र तलाठी,ग्रामसेवक कृषी सहायक यांना तहसीलदार ,तहसील कार्यालय वरोरा तर्फे पत्र देण्यात आले .

Check Also

दुःखद निधन – श्रीमती.गिरजाबाई साहेबलालजी ढूँढेले (सावनेर ) इनका दुःखद निधन

🔊 Listen to this दुखद समाचार आप सभी को अत्यंत दुख साथ यह सुचित किया …