Breaking News

*मौदा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा द्या शिवराज बाबा गुजर यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी*

*मौदा ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा द्या शिवराज बाबा गुजर यांची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी*


मौदा प्रतिनिधि

मौदा – येथे ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत तयार होऊन 3 वर्ष झाले परंतु खऱ्या अर्थाने मौदा ग्रामीण रुग्णालय अजूनही सुरू झाले नसल्यामुळे तालुक्यातील नागरिकांना नागपूर किंवा भंडारा येथे उपचारासाठी जावे लागते मौदा शहरातून राष्ट्रीय महामार्ग जात असून महामार्गावर नेहमी अपघात होत असतात अशावेळी अपघात ग्रस्त रुग्णाच्या उपचारासाठी मौदा ग्रामीण रुग्णालयात आवश्यक सुविधा नाही त्यामुळे रुग्णाला नागपूर किंवा भंडारा येथे न्यावे लागते आज या रुग्णालयात पुरेसा कर्मचारी वर्ग नाही अनेक पदे रिक्त आहे रुग्णवाहिणीची संख्या अपुरी आहे सद्यया तालुक्यात कोरोना रुग्ण वाढत आहे या रुग्णांना या रुग्णालयात उपचार होण्याच्या दृष्टीने येथे कोविड सेंटर तयार करावे महामार्गावर अपघातात एखाद्या वेक्तीचा मृत्यू झाला तर शवविच्छेदन करण्याकरिता शव नागपूरला न्यावे लागते त्यामुळे मृतकाच्या नातेवाईकाला प्रचंड त्रास सहन करावा लागतो मौदा येथे शवविच्छेदन ची इमारत मागील अनेक वर्षांपूर्वी तयार झाली आहे पण डॉक्टर नियुक्त नसल्यामुळे मौदा येथे शवविच्छेदन होत नाही या व इतर मागण्याचे निवेदन राष्ट्रीवादी काँग्रेस चे जिल्हा अध्यक्ष शिवराज बाबा गुजर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना दिले तसेच मौदा तालुक्यातील कोरोना परिस्थिती वर विस्तृत चर्चा केली तसेच मौदा येथील ग्रामीण रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे अशी मागणी गुजर यांनी मंत्रीमहोदय यांचेकडे केली

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …