Breaking News

*वरोरा चिमूर महामार्गावर भीषण अपघात* *जिल्ह्यातील राजकीय उदासीनतेमुळे महामार्गाचे काम अपुरेच*

*वरोरा चिमूर महामार्गावर भीषण अपघात*

*जिल्ह्यातील राजकीय उदासीनतेमुळे महामार्गाचे काम अपुरेच*

वरोरा प्रतिनिधि- मुज्जमिल शेख

वरोरा- शेगाव पासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या भेंडाळा गावाजवळ एसआरके कंपनीच्या ट्रकने दुचाकीस्वार तीन व्यक्तींना चिरडल्याने गावातील नागरिकांनी कंपनीची वाहतूक थांबवली. मागील काही वर्षापासून अपघाताचे प्रमाण वाढल्याने गावकर्‍यांचा रोश या कंपनीच्या प्रति वाढतच आहे. घटनास्थळी शेगाव पोलीस ठाणेदार सुधीर बोरकुटे यांनी समयसूचकता दाखवून दोन्ही जखमींना उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे दाखल करण्याची व्यवस्था केल्याने परिस्थिती निवळली.

महालगाव कडून चिमुर कडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक MH34 AY 6674 ला एस आर के कंपनीच्या हायवा ट्रक क्रमांक AP02TE3290 ने पाठीमागून धडक दिल्याने अपघात झाला . या मध्ये शरद जागोजी बदकी वय 45 वर्ष राहणार महालगाव यांचा पाय तुटला असून गंभीर जखमी आहे. निलेश शंकर आवारी वय 24 वर्ष , गंभीर जखमी असून ,रुपेश विनायक वाघाडे वय 32 यांना किरकोळ मार आहे. हे तिघेही नेरी येथे जात होते. जात असताना भेंडाळा या गावा पुढील काही अंतरावर कंपनीने रोडचे खोदकाम करून ठेवल्याने रोड खराब अवस्थेत आहे. त्यामुळे दुचाकीस्वार चालकाने ट्रक येत असल्याने आपल्या बाजूला दुचाकी करून थांबली असता मागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंपनीच्या कॉंक्रीट भरलेल्या ट्रकने दुचाकीसह तिघांनाही चिडलेले. यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक असून दोघेजण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमी शरद बदकी व निलेश आवारी यां जखमींना जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. कंपनीतर्फे तात्काळ मदत म्हणून वीस हजार रुपये परिवाराला देण्यात आले आहे. पुढील खर्चसुद्धा कंपनीच करणार असल्याचे कंपनीचे मॅनेजर प्रसाद सर यांनी सांगितले. शेगाव पोलिसांनी ट्रक व चालकास ताब्यात घेतले असून अपघाताचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू आहे.
परंतु मागील कित्येक वर्षापासून चिमूर वरोरा महामार्गsrk कंपनी तर्फे बांधकाम करण्यात येत आहे. आतापर्यंत बरेच लोकांचे जीव या रस्त्यावर गमवावे लागले आहे. अजूनही वरोरा चिमूर महामार्गाचे काम पूर्णत्वास आलेले नाही त्यामुळे हा रोड या वाहतूक करणाऱ्या लोकांसाठी जीवघेणा ठरत आहे.

प्रशासनातर्फे व राजकीय उदानशीतेमूळे या कंपनीला अभय देण्याचे काम प्रशासन करत असल्याची बोंब येथील जनता करत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …