*चंद्रपुरात सात दिवसाचा जनता कर्फ्यू*

*वाढत्या कोरोना विषाणूंची साखळी तोडने आवश्यक– वीजय वडेट्टीविर*

*जनता कर्फ्यू मुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले*
चंद्रपुर विशेष प्रतिनिधि
चंद्रपुर- दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात जनता कफ्फ्यूची घोषणा केली. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्यात मोठी झुंबड उडाली याचाच फायदा घेत ठोक विक्रेत्यांनी जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात २५ सप्टेंबरपासून १ ऑक्टोंबरपर्यंत सात दिवस जनता कर्फ्यू ची घोषणा केली*
*संधिचे सोने करताहेत व्यापारी वर्ग*
*सुमारे सात दिवस किराणा सामान, डेली निड्स भाजी मार्केट आदी दुकाने पूर्णतः बंद राहणार असल्याचे मॅसेज सोशल मीडियावर वायरल झाले. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत मोठी गर्दी उसळू लागली. त्यामुळे मोठ्या व्यापारी, ठोक विक्रेते यांनी तेल, आटा, साखर, तांदूळ, गहू च्या दारात एका किलोमागे पाच ते दहा रुपयापर्यंतची वाढ केली. परंतु, सात दिवस दुकाने बंद राहिल्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी ग्राहकही अतिरिक्त दर देऊन साहित्यांची खरेदी करीत आहेत.*
*जनता कर्फ्यू ची घोषणा होताच बाजारपेठेत मोठी गर्दी उसळली आहे.व या गर्दीचा फायदा दुकानकार उचलत असल्यामुळे भाजीपाल्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. कांदा ३० रुपये किलोवरुन ६० रुपये किलो, टमाटर ५०, आलू ५०, फुलकोबी १००, वांगी ३० रुपये प्रति किलो विक्रीला होता. प्रत्येक किलोमागे किमान १० ते ३० रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र सात दिवस बाजारपेठ बंद राहत असल्याने नागरिकांना अडचण जात आहे.*
Maharashtra News Media सच की आवाज