*आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपण व रक्तदान शिबीर संप्पन्*

वर्धा प्रतिनिधि- पंकज रोकडे
आर्वी- पंडित दिनदयाल उपाध्याय यांची जयंती व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याचां जन्मदिवस १७ तारखेला होता.यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी आर्वी विधानसभा क्षेत्र यांनी आमदार दादाराव केचे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सेवा सप्ताहा’ चे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पक्ष आर्वी विधानसभा क्षेत्र आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यात विविध पर्यावरण पुरक आणि जनपोयोगी उपक्रम पार पडत आहे. आर्वी येथे सकाळी आमदार दादाराव केचे यांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत वृक्षारोपण केले. तद्नंतर आर्वी येथील स्व. लक्ष्मणराव मानकर सभागृह येथे भाजपने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात पुर्ण वेळ उपस्थिती तर लावत रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन उत्साह वाढविला. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून गरजूंना दान केलेले रक्त उपलब्ध होऊन एखाद्याचे आयुष्य वाचविण्याचे काम असल्याने नियमित रक्तदान करावे असे आवाहन आमदार दादाराव केचे यांनी केले.

या प्रसंगी वरूण पाठक वर्धा जिल्हाध्यक्ष भाजयुमो, शुभांगी पुरोहित युवती प्रमुख वर्धा जिल्हा, विजय बाजपेयी आर्वी विधानसभा प्रमुख, प्रशांत सव्वालाखे नगराध्यक्ष आर्वी नगरपरिषद आर्वी, भारती देशमुख उपाध्यक्ष आर्वी नगरपरिषद, प्रशांत वानखेडे अध्यक्ष भाजप आर्वी तालुका, विनय डोळे अध्यक्ष भाजप आर्वी शहर, प्रविण पवार उपाध्यक्ष भाजयुमो वर्धा जिल्हा, मयुर पोकळे अध्यक्ष भाजयुमो आर्वी शहर, जितेंद्र ठाकरे अध्यक्ष भाजयुमो आर्वी तालुका, वैभव तिजारे सचिव भाजयुमो वर्धा जिल्हा, राम मोहीते सचिव भाजयुमो वर्धा जिल्हा, शुभम लोणकर जिल्हा संयोजक भाजयुमो वर्धा जिल्हा, मिलिंद गोहत्रे उपाध्यक्ष भाजयुमो आर्वी शहर, सुनिल बाजपेयी, राजाभाऊ गिरधर, राजाभाऊ वानखेडे, ओमप्रकाश कडू, सचिंन्द्र कदम, धर्माजी तेलमोरे, अश्विन शेंडे, मनिष उभाड, बालूभाऊ बोके, योगेश सरोदे, वैभव कदम निखिल कडू, ऋषिकेश गुल्हाने, मनोज कसर,प्रफुल्ल ठाकरे, विवेक वासेकर, दिनेश वर्गणे, दिनेश लायचा मिडीया संयोजक वर्धा जिल्हा, मिथुन बारबैले, सारीका लोखंडे, गंगाताई चकोले, उषाताई सोनटक्के, प्रतिभा गिरी, हर्षल पांडे, निलेश देशमुख, मिथुन बारबैले, अफसर खान, आदित्य वानखेडे, जगन गाठे, सुरेश मोटवाणी, अरूण ढोक, बाळा नांदूरकर, मिलिंद काळबांडे, विष्णू सवई, गौतम जैन, जयंत घोडमारे, रवी गाडगे, नितेश मेश्राम, बंटी चांदुरकर यांच्या सह भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच रक्तदान शिबीर संचालन हेडगेवार रक्त पेढी नागपूर यांचे डॉ. असीनकर, अंजली नगरारे, प्रनाली आंबटकर, चेतन निर्वार, अश्विनी सहादेवकर, स्नेहल भगत, माधुरी भिसेन, प्रियंका पांडे, रिना रामडोहकर, प्रिया थुल, संजीवनी पिपाटे, अनुप बिल्लुरकर, कुणाल कोल्हे, सुनिल साठे यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज