Breaking News

*तांत्रिक कामगार युनियन कडून राज्यात साडेसहा हजार रक्तदान*

*तांत्रिक कामगार युनियन कडून राज्यात साडेसहा हजार रक्तदान*

नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी:- दिलीप येवले

नागपुर:- विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यभर तिन्ही कंपनीतील सभासदाकडून 6630 एवढे रक्तदान झाल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन कंपनीत अग्रेसर असलेली संघटना आहे. संघटनेच्या 43 वा वर्धापन दिन चार सप्टेंबरला होत असताना यावेळी फक्त शतप्रतिशत रक्तदानाचे कार्यक्रमाने सर्वत्र वर्धापन दिन साजरा करण्याच्या संघटनेने निर्धार केला होता. त्यासाठी जून पासून नियोजन होते. कोवीड -19 चे संकट असताना सुद्धा शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून संघटनेमार्फत 6630 रक्तदान सभासद, रक्तदाते यांच्याकडून करून घेण्यात संघटना यशस्वी झाली जवळपास पंधराशे सभासद कोणता न कोणत्या कारणाने रक्तदानापासून रिजेक्ट झाले तर तेवढे सभासद इच्छा असूनही रक्तपेढीचे कर्मचारी दिवसभर थकून गेल्याने रक्तदान करू शकले नाहीत. जवळपास नऊ हजार पाचशे सभासद रक्तदाते रक्तदान करण्यासाठी त्या ठिकाणच्या शिबिराचे ठिकाणी हजर झाले होते. त्यापैकी 6630 रक्तदात्यांनी स्वयंप्रेरणेने रक्तदान केले.
डिस्टन्सिंगचे पालन पाळून तसेच जास्त गर्दी होता कामा नये असा विचार करून दिनांक 28 ऑगस्ट पासूनच रक्तदान शिबिरे सुरू झाली होती. 3 सप्टेंबर पर्यंत चार हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले. मात्र वर्धापन दिना दिवशी तब्बल 2 हजार 200 पेक्षा जास्त सभासद रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यानंतर ही कोल्हापूर, सोलापूर, वर्धा, कोकण या ठिकाणच्या सभासदांनी उत्स्फूर्त पणे रक्तदान केले. संघटनेची सभासद संख्या पाहता अजूनही खूप रक्तदानाची संख्या वाढवण्यासाठी वाव आहे सभासदाला स्वतःला काही अडचण असल्यास त्याने डोनर देऊन स्वतःची जबाबदारी पार पाडायची आहे.
सध्याच्या कोवीड -19 संकटाचे काळात रक्तदान करण्यास कोणीही तयार होत नाही. अनेकांना रक्ताची गरज होती. मुख्यमंत्र्यांनी रक्तदानाचे आव्हान केले होते संघटना नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासताना पुढे असते covid-19 संकटासाठी 2500 पदाधिकाऱ्यांचे स्वईच्छेने एक दिवसाचे वेतनाव्यतिरिक्त 15 लाख 13 हजार एवढी मदत संघटने मार्फत शासनाला केली होती. संघटनेची ताकत जरी मोठी असली तरी त्या ताकतीचा संघटना नेहमीच सकारात्मक वापर करत आली आहे. राज्यात विविध ठिकाणी झालेल्या शिबिरांना लोकप्रतिनिधी, शासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी, वीज कंपनीचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी भेट देऊन संघटनेच्या कार्याचे कौतुक केले. त्यांच्या हस्ते उद्घाटनासह रक्तदात्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. अनेक सामाजिक संघटनांनी मदत देखील या कामी केली. जगा उपलब्ध करून देण्यापासून सँनिटायझर करण्यापर्यंत मदत केली. अनेकांनी विविध भेटवस्तू संघटनेमार्फत दिल्या रक्तदात्यांना टी-शर्ट, सँनीटायझर, मास्क, पाण्याची बॉटल, प्रमाणपत्र आदी भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
कोवीड-19 संकट असल्याने परिस्थिती पाहून रक्तदान कार्यक्रम सुरू ठेवण्याच्या निर्णय संघटनेने घेतला असून यापुढेही ही संघटनेचे पदाधिकारी सभासद आपला सहभाग निश्चित नोंदवतील असा विश्वास सरचिटणीस आर टी देवकांत यांनी व्यक्त केला आहे. सर्व रक्तदात्यांचे पदाधिकाऱ्यांचे संघटनेचे अध्यक्ष रवी बारई, उपाध्यक्ष गजानन सुपे, प्रवीण पाटील, उपसरचिटणीस नितीन पवार, उत्तम रोकडे, बाळासाहेब गायकवाड, राज्यसचिव हरीराम गीते, कोषाध्यक्ष संतोष घाडगे, तांत्रिक शक्ती संपादक राम चव्हाण यांनी अभिनंदन करून सर्वांना धन्यवाद दिल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रक्तदान करणारी यांनी वीज कंपनीतील तांत्रिक कामगार युनियन ही एकमेव संघटना आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …