Breaking News

*पत्रकारांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा जाहिर निषेध* *पदाचा दुरुपयोग करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर कायदेशीर कारवाई करा* *तहसिलदार, खंड विकास अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना दिले नरखेड तालुका मराठी पत्रकार संघाने निवेदन* *नरखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेची मागणी*

*पत्रकारांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा जाहिर निषेध*

*पदाचा दुरुपयोग करणाऱ्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांवर कायदेशीर कारवाई करा*

*तहसिलदार, खंड विकास अधिकारी,पोलीस निरीक्षक यांना दिले नरखेड तालुका मराठी पत्रकार संघाने निवेदन*

*नरखेड तालुका मराठी पत्रकार संघटनेची मागणी*

नरखेड़ तालुका प्रतिनिधी -श्रीकांत मालधुरे

सावरगाव :- सर्व सामान्य नागरिकांना आपल्या दैनिकाच्या माध्यमातून न्याय मिळवून देणाऱ्या पत्रकारांवर हक्कभंगाचा प्रस्ताव पारित करण्यात आल्याचा प्रकार नरखेड तालुक्यातील सावरगाव ग्रामपंचायत येथे नुकताच घडला सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणे पत्रकारांचे प्रथम कर्तव्य आहे.मात्र समाजाचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांचा आवाज दडपण्याचा केल्यामुळे सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा नरखेड तालुका पत्रकार संघटनेने जाहिर निषेध केला असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही केली आहे. यासंदर्भातील मागणी नरखेड तालुक्याचे तहसिलदार हरीश गाढे,खंड विकास अधिकारी प्रशांत मोहोड,पोलीस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सावरगाव येथील योगेश मोतीराम गिरडकर वार्ताहार म्हणून कार्यरत आहेत गिरडकर आपल्या दैनिकाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा सदैव प्रयत्न करतात.नरखेड तालुक्या अंतर्गत असलेल्या सावरगाव ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत असलेल्या लिपिकाचा गलथान व भ्रष्टाचाराचा कारभार चव्हाट्यावर आला होता.त्यामूळे सदर विषय ग्रामसभेत आल्यावर दिनांक 02/02/2019 ला झालेल्या ग्रामसभेने त्याला त्याच्या पदावरून पायउतार केले मात्र त्यांचा रोजगार कायम राहण्याच्या दृष्टीकोनातून त्यांची पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून नियुक्ती केली.त्यानंतर दिनांक 01/09/2020 ला सरपंच प्रगती ढोणे यांनी विशेष सभा घेऊन त्याची पुन्हा लिपिक पदावर नियुक्ती केली.

या नियुक्तीसंदर्भात सरपंच प्रगती ढोणे यांनी ग्रामसभेचा अपमान केला अश्या आशयाच्या बातम्या बऱ्याच वर्तमान पत्रात बातम्या झळकल्या.त्यामुळे याविरोधात सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच प्रगती ढोणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य यांनी चिडून दिनांक १६ सप्टेंबर २०२० च्या मासिक सभेत विशेष ठराव पारित करून पत्रकार योगेश गिरडकर यांच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव आणला. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार हक्कभंग ठराव पारित करण्याचे अधिकार सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्यांना नाहीत मात्र त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न केला आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे याच भान संघटनेच्या सर्व पत्रकार बंधूंना असल्यामूळे सरपंच प्रगती ढोणे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही सरपंच प्रगती ढोणे ह्या सर्वसामान्य जनतेतून थेट निवडून आल्या आहेत.त्यामूळे त्यांना आपल्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही.त्यामूळे ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या समस्यांच्या प्रश्नांचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे मात्र दुर्दैव उत्तर मिळत नाही.जागरूक पत्रकारावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणणे निंदनीय आहे त्यामूळे सावरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच प्रगती ढोणे व ग्रामपंचायत सदस्यांचा नरखेड तालुका पत्रकार संघाने जाहिर निषेध केला असून नरखेडचे तहसिलदार हरीश गाढे,खंड विकास अधिकारी प्रशांत मोहोड तसेच पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांना दिलेल्या निवेदनातून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा ईशारा नरखेड तालुका पत्रकार संघाच्यावतीने देण्यात आला आहे.निवेदन देतांना नरखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे प्रभारी अध्यक्ष महेश मोहणे,जिल्हा प्रतिनिधी श्याम नाडेकर,सचिव योगेश गिरडकर,भारत अरमरकर,शिरीष खोबे,कैलाश कांबळे,नरेश बरोले,संदीप मेंढे,श्रीकांत मालधुरे,नरेश सौदागर आदी उपस्थित होते.

पत्रकाराकडे समाजाचा चौथा आधारस्तंभ म्हणून बघितले जाते पत्रकार नेहमी आपल्या दैनिकाच्या माध्यमातून सर्व सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात परंतु सावरगावच्या सरपंच प्रगती ढोणे यांनी पूर्णपणे पत्रकारांची व्याख्याच बदलून टाकली आहे पत्रकारांवर त्या हाकनाक आरोप करीत आहे आम्हा सर्व पत्रकारांना कर्तव्याची जाणीव आहे मात्र प्रतिसाद मिळत नाही त्यामूळे दुसरी बाजू उमटून येत नाही सावरगावच्या सरपंच ह्या उच्चविभूषित आहेत मान्य आहे मात्र त्या शिक्षणाचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी अपेक्षित आहे मात्र ग्रामपंचायतच्या मासिक सभेत एका पत्रकार बांधवावर हक्कभंगाचा प्रस्ताव पारित करने नन्यायसंगत नाही हा एक प्रकारे पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा प्रयत्न असून लोकशाहीची थट्टा करणारा आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …