*गडचिरोली जिल्हयात ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली: जिल्हयात आज ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर ९५ नवे कोरोनाबाधित आढळून आले. आजच ६१ जणांनी कोरोनावर मात केली.
आज चामोर्शी तालुक्यातील मुरखळा चक येथील ७० वर्षीय वृद्ध, गडचिरोली शहरातील हनुमान वॉर्डातील ६३ वर्षीय महिला, आरमोरी तालुक्यातील इंजेवारी येथील एक ५० वर्षीय व्यक्ती, तसेच आरमोरी शहरातील बर्डी वॉर्डातील ५३ वर्षीय पुरुष असे चार जण कोरोनामुळे दगावले.
यामध्ये गडचिरोलीमधील पोलीस मुख्यालय, रामनगर, साईनगर, सोनापूर कॉम्प्लेक्स, वनश्री कॉलनी, पोलीस कॉलनी, कॅम्प एरिया, ग्रामसेवक कॉलनी, शेडमाके वॉर्ड, गोकुळनगर, कन्नमवार वॉर्ड, विवेकानंदनगर, जिल्हा सामान्य रुग्णालय, सदगुरूनगर, पोलीस संकुल, मोरेश्वर पेट्रोल पंपासमोरील प्रत्येकी एक, गोंडपिंपरीहून तसेच ब्रहमपुरीहून आलेला प्रत्येकी एक, सर्वोदय वॉर्ड २, नवेगाव ४, सीआरपीएफ २ व लांजेडा येथील २ अशा २८ जणांचा समावेश आहे. एटापल्ली शहराज एक रुग्ण आढळला. आरमोरी शहरात ७, कोरची शहर २ आणि सी-६० जवान १३, अहेरी शहरात ८, तसेच रायपूर, जिमलगट्टा, महागाव व कमलापूर येथे प्रत्येकी एका व्यक्तीस कोरोना संसर्ग झाला आहे. देसाईगंज येथील माता मंदिर, कुरूड, बनसोड रूग्णालय, कस्तुरबा वॉर्ड मधील प्रत्येकी एक आणि सावंगी येथील २ असे १० जण बाधित आढळले. धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील २, सिरोंचा शहरातील ११, कुरखेडा शहर व कढोली येथील प्रत्येकी १, भामरागड शहरातील १ आणि चामोर्शी शहरातील २, मुरखळा माल येथील १ व येनापूर येथील २ जण बाधित आढळले.
आजच गडचिरोलीमधील ३१, आरमोरी ५, कोरची १, चामोर्शी ७, सिरोंचा ७ आणि देसाईगंज तालुक्यातील १०, असे एकूण ६१ रुग्ण आजारातून बरे झाले. आतापर्यंत. जिल्हयात २५१४ जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १८५२ रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. सध्या ६४२ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ७३.६७ टक्के, तर मृत्यू दर ०.८० टक्के एवढा आहे.
Maharashtra News Media सच की आवाज