*मोवाड गणेशपुर मार्गाने रेतीची अवैध वाहतुक सुरू*
*महसुल व पोलीस विभागातील अधिकारी गाढ झोपेत,भुमिकेवर प्रश्नचिन्ह*
नरखेड तालुका प्रतिनिधी- श्रीकांत मालधुरे
नरखेड़- अलिकडच्या काळात नरखेड तालुक्यामध्ये अवैध व ओहरलोड रेतीची वाहतुक वाढली आहे. या वाहतुकीमुळे डांबरी रोडची दैनावस्था होत आहे. या वाहतुकीबाबत महसुल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना इत्थभूत माहीती आहे. मात्र कुणीही कार्यवाही करण्याची हिंम्मत करीत नसल्याने आश्चर्य केले जात आहे.
नागपूर जिल्ह्यातील कोणत्याही नदीवरील रेतीघाटाचा लिल्लाव झाला नाही. मात्र सावनेर , कामठी , पारशिवनी व मौदा तालुक्यातील कन्हान नदीच्या पात्रातुन मोठ्याप्रमाणात रेतीचा अवैध उपसा सुरू आहे. बाजारात कन्हान नदीच्या तांबड्या रेतीला भरिव मागणी असल्याने ती रेती अलिकच्या काळात नरखेड मार्गे अमरावती जिल्हात मोठ्या प्रमाणात आणली जात आहे.
ही रेती सावनेर तालुक्यातील खापा , सिल्लेवाडा या भागातुन येत आहे .ही रेती चढ्या भावाने विकली जात आहे.ही रेती कुठून आणली जाते. रेती वाहतुकीचा मार्ग कोणता आहे. ती दिवसा व रात्री आणली जाते या बाबत नरखेड तालुक्यातील महसुल व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांना इंत्थभूत माहीती आहे.या वाहतुकीवर कोणतीही कार्यवाही करित नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात असून ‘अर्थ ‘ पूर्ण संबधामुळे याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची माहीती सुत्रांनी दिली.
किमान १०० -१५० टिप्पर रेतीची वाहतूक सावरगाव – नरखेड – मोवाड – वरुड या मार्गांनी दिवसाव रात्रीच्या वेळी १०० ते १५० टिप्पर रेतीची वाहतुक केली जाते. प्रत्येक टिप्पर ची परवानगी ४-६ ब्रास ची असतांना त्यात १५ ते १८ ब्रास रेती आणली जाते. या टिप्पर च्या किमान १५ ते ३० टन वजनामुळे मजबूत असलेल्या डांबर रस्ते पूर्णतः खराब झाले आहे. या रस्तावर नागरिकांना ये -जा करायला त्रास सहण करावा लागत आहे.पण या त्रासाचे सोडा दोन्ही विभाग आपले खिशे गरम करण्यात व्यस्त आहे,यात लाखोंची उलाढाल होत असते,यावर कोणी आवाज उचलण्याचा जर प्रयत्न केला तर त्या आवाज उचलणाऱ्यावर उलट आरोप करून त्यांचे तोंड बंद केले जाते,टिप्पर/टॅक्टर वाल्यांची ठाण्यात मिलीभगत असते,रेती मद्धे ऐवढी कमाई असते की टायर पंचर च्या दुकान चालविणाऱ्या जवळ आज २/३ टिप्पर आहे, यावरून आपण अंदाज लावू शकता.वातावरण तापले की थातुरमातुर कारवाही केली .जाते,पण त्यानंतर मात्र सर्रास रेतीतस्करची रेती चोरी सुरूच असते कारण सर्व सेटल असते..

पुर्ण मिलीभगत चा प्रकार :-
या वर्षी कोणत्याही रेती घाटाचा लिल्लाव झाला नसतांना खुलेआम दिवसा ढवळा रेतीचे टिप्पर तहसिलदार व पोलीस स्टेशन च्या २०० मिटर अंतरावरून खुलेआम जात आहे.त्यांना सावनेर,काटोल,नरखेड या तिन्ही ठिकानचे तहसिलदार व पोलीस निरीक्षक कुठेही कार्यवाही करत नाही. जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन सुध्दा कार्यवाही होत नाही.याचा अर्थ मिलीभगत करून अवैध धंदा सुरु आहे.
– राजु हरणे
शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ( ग्रा )

संपूर्ण रस्त्याची दुर्दक्षा :-
उपविभागिय अधिकारी यांना निवेदन दिले असता त्यांनी तहसिलदार व पोलीस अधिकारी यांना पत्र देऊन अवैध वाहतुकीवर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.पण मात्र तहसिलदार व पोलीस निरीक्षक यांना फोन केला की फोन ही उचलत नाही.
– ललित खंडेलवाल
तालुका प्रमुख युवासेना नरखेड
Maharashtra News Media सच की आवाज