Breaking News

*भरधाव ट्रक ने तिन ट्रक चालकांना चिरडले* *तिन ट्रक चालकांचा घटनास्थळी मृत्यू,एक गंभीर!*

*भरधाव ट्रक ने तिन ट्रक चालकांना चिरडले*


*तिन ट्रक चालकांचा घटनास्थळी मृत्यू,एक गंभीर!*

कोंढाळी प्रतिनिधि- दुर्गाप्रसाद पांडे

नागपुर –अरावती राष्ट्रीय महामार्ग क्र-सहा वरील कोंढाळी लगच्या सोनेगाव शिवारात २९सप्टेंबर चे मध्रात्री 12-30चे दरम्यान महामार्ग ओलांडणार्या तिन वाहन चालकांना भरधाव वेगात येणार्य ट्रक चालका ने तिन्ही वाहन चालकांना जागीच चिरडले.


मिळालेल्य माहितीनुसार २९सप्टेंबर रोजी नागपुर वरून ट्रक क्रमांक एम एच-30-ए बी-१२७९व एम एच-30-ए बी-३८६१ दो ट्रक तांदुळ भरून तिवसा कडे जात होते. या दरम्यान रात्री जेवणा करीता दोन्ही ट्रक चालकांनी आप आपले वहाने कोंढाळी नजिकच्या सोनेगाव शिवारातील ढाब्या समोर उभी करून मार्ग ओलांडत असतांना नागपुर कडून अमरावती कडे अती वेगात जानार्या वाहनाने शेख अन्नू (२०),जावाद खान(२८),शेख परवेज(३५),सर्व अकोला निवासी यांना सोनेगाव शिवारात घटना स्थळी च चिरडले यात तिन्ही ट्रक चालकांचा जागीच चेंदामेंदा झाला, तर फिरोज खान हा ही ट्रक चालक या घटनेत गंभीर जखमी अवस्थेत कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डाक्टर अश्विनी दातीर व डाक्टर बीलाल यांनी गंभीर जखमी चे प्रथमोपचार करून नागपूर शासकिय रूग्णालयात पाठविले, तर तिन्ही मृतक चालकांना काटोल ग्रामिण रूग्णालय येथे शवविच्छेदनाकरीता पाठविले आहे कोंढाळी पोलीस स्टेशन चे अधिकारी शाम गव्हाने व त्यांचे सहकारी पुढिल तपास करीत आहे.

Check Also

*नन्ही रोजेदार – कु.जामिया जमिर शेख*

🔊 Listen to this *नन्ही रोजेदार* सावनेर ः पवित्र रमजान के अवसरपर शहरकी पाच वर्षीय …