*सेवानिवृत्त सोहळ्यात सहकर्मी यांना सॅनिटाईजर व मास्क चे वाटप*
नागपुर उपजिल्हा प्रतिनिधी दिलीप येवले
नागपुर:- कोरोना महामारीच्या काळात जेव्हा सर्व विश्व यांच्यातून ग्रसित आहे. अश्यावेळी L.I.C.( जीवन बीमा महामंडळात) ला काम करीत असणारे नरेंद्र आनंदरावजी चिलाटे यांनी आपल्या सेवानिवृत्त सोहळ्यात आगळावेगळा उपक्रम राबवला, त्यांनी आपल्या सहकामीयांना सेवानिवृत्त होताना कोरोना महामारीतुन सुरक्षासाठी सॅनिटायजर व मास्क चे वाटप केले. यावेळेस कार्यालय प्रमुख प्रवीण सहस्त्रबुद्धे यांनी नरेंद्र चिलाटे यांना येणारे भविष्या साठी शुभेच्छा दिले. L.I.C. ला (जीवन बीमा महामंडळात) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नरेंद्र चिलाटे यांनी सॅनिटायझर व मास्क दिल्याबद्दल आनंद जाहीर केले. तसेच यावेळी विदर्भ फार्मसी असोसिएशन च्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कोव्हीड योद्धा म्हणून नरेंद्रजी चिलाटे यांच्या सत्कार मुख्य संयोजक निखिल भुते व अध्यक्ष विक्रांत चिलाटे यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करिता राजाभाऊ चिलाटे, प्रणव कुमार किरण , बायस्कर मॅडम, दिलीप चिलाटे यांनी केले.
Maharashtra News Media सच की आवाज