*आज २ आक्टोंबर २०२० ला न.प.अभ्यंकर प्राथमिक शाळेत जेष्ठ शिक्षिका सौ.सुनंदा अशोक राऊत यांच्या सेवानिवृत्ती चा कार्यक्रम पार पडला*

सावनेर- मा.नगराध्यक्षा सौ.रेखाताई अरूण मोवाडे यांच्या हस्ते सत्कार मुर्ती सौ.सुनंदा अशोक राऊत यांचे शाॅल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी न.अभ्यंकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ अनिता गणेश झाडे , मुख्याध्यापक श्री.सुर्यवंशी सर सुभाष मराठी प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ.संगीता रुषीया मुख्याध्यापिका फरीदा सैय्यद श्री.सुरेश गजभे,श्री.गजानन पटले,सौ.नर्मदा डवरे,कु.दिप्ती खोब्रागडे,प्रज्ञा बांगडे,श्रीमती.वीजताई श्रीवास्तव,श्रीमती अनुसया नारेकर उपस्थित होत्या.

यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका सौ.राऊत मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच माजी विद्यार्थ्यींनी दिक्षिका घारड हिने ही आपले मनोगत व्यक्त केले.नगराध्यक्षा सौ.रेखाताई मोवाडे यांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.अनिता झाडे मॅडम,सुत्रसंचालन श्री.नरेन्द्र चापरे सर आणि आभार प्रदर्शन नर्मदा डवरे मॅडम यांनी केले.

Maharashtra News Media सच की आवाज