*शिवसेना,भाजप,मनसेचे उद्या “लक्षवेध” आंदोलन*
*बोरकर यांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस तरी येथील प्रशासन बेफिकर*
कोरपना प्रतिनिधि- गौतम धोटे
कोरपना :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना आदिवासी बहुल तालुक्यातील गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची शासनाने त्वरित उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,आधिकारी, कर्मचारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी,दोषींवर कायदेशीर कारवाई तसेच कंत्राटदाराचा परवाना काळ्या यादीत टाकावा या मागणीच्या पूर्ततेसाठी “भीम आर्मी” जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी 30 सप्टेंबर पासून गडचांदूर नगरपरिषदपुढे अन्नत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे.बोरकर यांच्या उपोषणाला अनेकांनी पाठिंबा दर्शविला असून उपोषणाचा तीसरा दिवस लोटला आहे.शासन उपोषणाला गांभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट दिसत असून याकडे शासनप्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी उद्या 3 आक्टोंबर रोजी शिवसेना,भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी तसेच मनसे व इतर पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपोषण मंडपात एक दिवसीय लक्षवेध आंदोलन करणार असल्याची माहिती (महाराष्ट्र न्युज मिडिया ला देण्यात आली आहे.
Maharashtra News Media सच की आवाज