*राहुल गांधीना धक्काबुक्की ; गडचिरोली निषेध*

गढ़चिरोली प्रतिनिधि-सूरज कुकुडकर
गडचिरोली: हाथरस येथे झालेल्या पीडित मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी जात असताना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना धक्काबुक्की करून कॉलर पकडण्यात आली. एखाद्या पीडित परिवाराला भेटायला जात असताना उत्तर प्रदेश सरकारकडून सदर प्रकरण दाबण्याचा दृष्टीने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचे जे षड्यंत्र सरकारतर्फे आखण्यात येत आहे, याचा निषेध म्हणून गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पुतळा स्थानिक इंदिरा गांधी चौक येथे दहन करून निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, प्रदेश सचिव विश्वजीत कोवासे, अतुल मल्लेलवार, रजनीकांत मोटघरे, आशिष कन्नमवार, वामनराव सावसाकडे, गौरव अलाम, एजाज शेख, घनश्याम मुर्वतकर, अभिजीत धाइत, गौरव एनप्रेड्डीवार, विपुल येलटीवार, समीर ताजणे, सोहेल शेख, प्रतीक बारसिंगे संतोष बारसिंगे सह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज