*मोवाड शहराचे स्वच्छतेत वाजले तिन तेरा*

*प्रशासनाचे दुर्लक्ष ; ठेकेदाराची मनमानी*

*स्वच्छता अभियान स्पर्धात क्रमवारी घसरण*
नरखेड तालुका प्रतिनिधि श्रीकांत मालधुरे
मोवाड- शहराचे स्वच्छता घनकचरा व्यवस्थापनेचे वाजले तिन तेरा. लाखो रुपयाचे टेंडर दर वर्षी काढले जातात. स्वच्छतेच्या नावावर अमाप पैसा खर्च केला जातो. पण मात्र त्याचा फायदा नागरीकांना होत नाही. घनकचरा ठेकेदारची दररोज २२ मजुर पुरवण्याची जबाबदारी असते. पण मात्र त्यातील १२-१४ मजूर कामावर असतात तर बाकिचे मजुर आठवाडी बाजारातील बाजार ओट्यांनवार बसले असतात. म्हणजेच दररोज कामावर २२ मजूरांची नोद केली जाते. मागील १ महिन्यात फक्त आठ दिवस कचरा गाड्या कचरा घ्यायला आल्या नी नंतर पून्हा गाड्या बंद पडल्या. नागरिकांच्या घरी रोज निघनारा कचरा हा तसाच आहे. पण मात्र यावर न.प. प्रशासनाचे लक्ष नाही. शहरातील नाल्या स्वच्छ नाही.शहरातील शासकीय शौचायल व मुतीरी पण अस्वच्छ आहे. सध्या मोवाड शहरात कोरोना सह निमोनीया चे रूग्ण आढळून आले आहे. अश्या वेळी घरातील कचरा घरी असल्या मुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.त्यामुळे मोवाड शहरात साथिचे रोग यायची भिती निर्मान झाली आहे. त्यामुळे मोवाड शहरातील नागरिक संतापले आहे.या सर्व समस्या वर तात्काळ उपाय योजना करणे यावी अशी मोवाड शहरातील नागरिक मागणी जोरधरत आहे.
Maharashtra News Media सच की आवाज