*खासदार अशोकनेते यांच्या हस्ते पोर्ला येथे स्वच्छता अभियान*
गढ़चिरोली प्रतिनिधि- सूरज कुकुडकर
गडचिरोली- स्वच्छता सेवा सप्ताहाअंतर्गत भारतीय जनता पार्टी व पंचायत समिती गडचिरोली च्या वतीने अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर जी शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या हस्ते गडचिरोली तालुक्यातील पोर्ला येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी खासदार अशोक नेते, प्रदेश सरचिटणीस प्रकाश जी गेडाम, प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, सभापती, उपसभापती, बीडीओ यांच्या हस्ते ग्राम पंचायत परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तदनंतर मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संदेश नागरिकांना देण्यात आला.
याप्रसंगी भाजपचे आदिवासी मोर्चा चे प्रदेश सरचिटणीस प्रकाशजी गेडाम, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रमेशजी भुरसे, पं स सभापती मारोतरावजी इचोडकर, उपसभापती विलासराव दशमुखे, गडचिरोली चे तालुकाध्यक्ष तथा पंस सदस्य रामरतनजी गोहणे, पंस सदस्या जास्वंदाताई गेडाम, तालुका महामंत्री रमेशजी कोलते, गडचिरोली च्या बीडीओ म्हरसकोल्हे, पं सचे अधिकारी, कर्मचारी व गावातील नागरिक उपस्थित होते.
Maharashtra News Media सच की आवाज